संजय राऊत मविआचं डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते…; सदाभाऊ पुन्हा बरळले!

Sadabhau Khot on Sanjay Raut: कारण डुकराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जातं”, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

हायलाइट्स:

  • संजय राऊत मविआचं डुक्कर
  • कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते
  • सदाभाऊ खोत पुन्हा बरळले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सदाभाऊ खोतांची संजय राऊतांवर टीका

मुंबई : ”संजय राऊतला गावगाडा माहिती नाही, त्यामुळे राखण करणारा कुत्रा म्हणजे काही माहित नाही. कुत्रा हा इमानदार असतो, धन्याची राखण करतो. तसं आम्ही आमच्या धन्याची इमाने-इतबारे राखण करत आहोत. पण तुम्ही २०१४ आणि २०१९ला नरेंद्र मोदी यांचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी फिरत होता, असा पलटवार आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांचा अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला आहे. चौफेर टीकेनंतर सदाभाऊ खोत यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, संजय राऊत यांनी थोबाडीत द्यायला हवी होती, अशी टीका करताच सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांची तुलना डुकराशी केली आहे.सदाभाऊ म्हणाले की, ”२०१९ मध्येही तुम्ही भाषण करत होता. सत्तेत आल्यावर तुम्ही पहिला खंजीर हातात घेतला. तुमच्यात इमानदारपणा आहे का शोधा आणि कुत्र्याएवढा जरी इमानदारपणा असता तर महाराष्ट्राने तुमचं कौतुक केलं असतं. तरीही मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही. कारण डुकराला कितीही साबण शाम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जातं”, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
पवारांबाबत जीभ घसरली, अजित दादांनी फोनवरुन खोतांना खडसावलं, म्हणाले सदाभाऊ पुन्हा जर…

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ”भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात विष पसरवलं आहे. शरद पवार साहेब या देशाचे सर्वोच्च नेते आहेत. नरेंद्र मोदी यांनी बारामतीला जाऊन शरद पवार हे आपले कसे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे हे वारंवार सांगितलं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट याच बीजेपी सरकारने शरद पवार साहेबांना देशातला भारतरत्न नंतरचा सर्वोच्च नागरिक किताब पद्मविभूषण दिला आहे. जो त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कामाबद्दल सामाजिक, कृषी, शैक्षणिक कामाबद्दल हा किताब त्यांना दिला आहे. आपण नक्की या राज्यासाठी काय योगदान दिलं याचे आत्मचिंतन देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने केलं पाहिजे. शरद पवारांसारखा नेता हा राज्यात नाही तर देशाच्या राजकारणातला भीष्मपिता आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही त्यांच्या आजारपणावर अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहेत”, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

”या राज्याला यशवंतराव चव्हाण पासून बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत तर विलासराव देशमुखांपर्यत आणि वसंतराव नाईक अशा सर्व महान राजकारणाची परंपरा आहे. त्या तुळशीच्या वृंदावनात ही भांगेची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावली आणि महाराष्ट्रात वीष पेरण्याचं काम सुरू आहे. कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर, कधी हे खोत कोण आहेत ते तुमचे? या राज्यात योगदान काय आहे? पण तुम्ही आमच्या जे बुलंद नेते आहेत त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना लोकं हसतात. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा तिरस्कार करतो. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला महाराष्ट्र नाकारत आहे. वारंवार यांचा तिरस्कार करत आहे. हा माणूस महाराष्ट्राचा नाही हा महाराष्ट्राचा शत्रू आहे यासाठी तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. ”तुम्ही ऐका ते भाषण तुम्हाला किळस येईल. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफाटात वाजवली पाहिजे आणि ते फिदीफिदी हसत आहे. देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवत आहे याची लाज वाटली पाहिजे. आम्हाला लाज वाटत आहे, तुम्ही कधी काळी आमच्या पाठिंबावर या राज्याचे मुख्यमंत्री होतात”, असं देखील राऊत म्हणाले.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

ajit pawarSadabhau Khotsadabhau khot criticizes sanjay rautsadabhau khot criticizes sharad pawarSanjay Rautअजित पवारसंजय राऊतसदाभाऊ खोतसदाभाऊ खोत शरद पवार टीकासदाभाऊ खोतांची संजय राऊतांवर टीका
Comments (0)
Add Comment