Never Keep These 5 Plants On Your Desk : आपल्यापैकी अनेकांना ऑफिसचा डेस्क स्वच्छ ठेवण्याची सवय असते. ऑफिस डेस्कवर आपण बरेचदा फॅमिली फोटो, देवाचे फोटो किंवा काही झाडे ठेवतो. त्यामुळे आपला डेस्क स्वच्छ आणि उठावरदार दिसतो. या वनस्पतींमधून निघणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या करिअरसाठी चांगले मानले जात नाही. जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये कोणती झाडे लावणे टाळायला हवे
आपल्यापैकी अनेकांना ऑफिसचा डेस्क स्वच्छ ठेवण्याची सवय असते. ऑफिस डेस्कवर आपण बरेचदा फॅमिली फोटो, देवाचे फोटो किंवा काही झाडे ठेवतो. त्यामुळे आपला डेस्क स्वच्छ आणि उठावरदार दिसतो.
वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर काही झाडे ठेवणे टाळायला हवे. ही झाडे कितीही सुंदर वाटत असली तरीही तुमच्या प्रगतीत अडथळा ठरु शकतात. या वनस्पतींमधून निघणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या करिअरसाठी चांगले मानले जात नाही. जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये कोणती झाडे लावणे टाळायला हवे.
बांबू
ऑफिसच्या डेस्कवर बांबूचे रोप ठेवणे अनेकांना आवडते. वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर बांबूचे रोप ठेवल्याने कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. तुम्हाला मानसिक समस्या त्रास देऊ शकतात
निवडुंग
निवडुंगाच्या रोपाला नागफणी म्हणतात. हे काटेरी रोप तुम्ही ऑफिसच्या डेस्कवर कधीही ठेवू नका. यातून बाहेर पडणारी ऊर्जा तुमच्या कामावर परिणाम करते. त्यामुळे तुम्ही कामवर लक्ष केंद्रित करु शकत नाही. तसेच कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कोरफड
कोरफड हे ऑफिस डेस्कवर ठेवणे टाळावे. ऑफिसच्या डेस्कवर कोरफड ठेवल्याने प्रमोशनमध्ये अडचणी येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार कोरफड डेस्कवर ठेवल्याने सहकर्मचाऱ्यांशी वाद होतो. तुमची इच्छा नसताना देखील तुम्ही त्यांच्याशी वाद घालता.
गुलाब
गुलाबाचे रोप दिसायला खूप छान असते. ऑफिसच्या डेस्कवर लहान गुलाबाचे रोप देखील ठेवू नका. ही काटेरी वनस्पती तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणू शकते. तुमच्या ऑफिस डेस्कवर गुलाबाचे रोप ठेवल्याने मूड स्विंगची समस्या उद्भवू शकते.
तुळशी
तुळशी रोप हे खरेतर शुभ मानले जाते. परंतु, ऑफिस डेस्कवर तुळशीचे रोप ठेवणे टाळायला हवे. तुळशीला एक पवित्र वनस्पती मानले जाते. ऑफिसच्या ठिकाणी तुळशीबाबत निष्काळजीपणा होऊ शकतो. त्यामुळे घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावणे केव्हा ही चांगले.