‘नणंदबाईंकडे खूप माल आहे’ म्हणणाऱ्या वहिनींवर नणंद यशोमती ठाकूरांचा पलटवार, ‘आमची वहिनी वायफळ बोलते’

Yashomati Thakur Commented on Navneet Rana Remarks: अमरावतीतील कट्ट्रर प्रतिस्पर्धी असणाऱ्या राणा आणि ठाकूरांमध्ये पुन्हा शा‍ब्दिक सामना रंगला आहे. माजी खासदार नवनीत राणांनी डागलेल्या आरोपास्त्रावर राणांच्या नणंदबाईंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमरावती : अमरावतीतील कट्ट्रर प्रतिस्पर्धी असणाऱ्या राणा आणि ठाकूरांमध्ये पुन्हा शा‍ब्दिक सामना रंगला आहे. माजी खासदार नवनीत राणांनी डागलेल्या आरोपास्त्रावर राणांच्या नणंदबाईंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझी नणंदबाई तीन टर्मपासून मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहे. पण देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंदबाईने केलं आहे. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघाला मागे नेण्याचं काम माझ्या नणंदबाईने केलं आहे,’ असे विधान नवनीत राणांनी केले आहे. यावर प्रत्युत्तर देताना यशोमती ठाकून म्हणाल्या, ‘आमची वहिनी वायफळ बोलते. तिने कधी संस्कार पाहिले नाही, म्हणून ती अशी बोलते.’

काल तिवसा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांची सभा पार पडल्यानंतर आज मविआच्या उमेदवार असलेल्या यशोमती ठाकूरांची प्रचार सभा पार पडली. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरुन यशोमती ठाकूरांनी नवनीत राणा जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
‘माझ्या नणंदबाईकडे खूप माल आहे, त्यांना कडक नोटा आवडतात,’ नवनीत राणांची यशोमती ठाकूरांवर घणाघाती टीका
यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘भाजपने संविधान तोडलं, दोन पक्ष फोडले, सुप्रीम कोर्ट म्हणते आम्ही निकाल देणार अरे कधी देणार तुम्ही निकाल? आम्ही एक एक रुपया जमा करून बळवंत वानखडे यांची लोकसभेची निवडणूक लढवली. पण आमची वहिनी वायफळ बोलते. तिने कधी संस्कार पाहिले नाही, म्हणून ती अशी बोलते.’ यासोबतच ‘हे बाप चोरणारे लोकं आहेत. सोनं चांदी पण चोरतात, अशी टीका देखील ठाकूरांनी केली.

दरम्यान यशोमती ठाकूरांनी काँग्रेसने दिलेली आश्वासनं पुन्हा अधोरेखित केली आहेत. ‘आम्ही प्रत्येक महिलेला तीन हजार देणार आहोत आणि शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत.’ यासोबतच राणांनी बळवंत वानखेडेंवर केलेल्या टीकेचाही ठाकूरांनी मोजक्या शब्दांत समाचार घेतला आहे, तुम्ही माझ्या भावाला बोलताय हे लक्षात ठेवा, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

mh vidhan sabha nivadnukNavneet Ranaprachar sabha of yashomati thakurtivasa vidhan sabhaYashomati Thakurतिवसा विधानसभा मतदारसंघातील राजकारणनवनीत राणांना प्रत्युत्तरयशोमती ठाकूरांची टीकायशोमती ठाकूरांचे प्रचार भाषणविधानसभेतील घडामोडी
Comments (0)
Add Comment