पालघर हादरलं! आधी पैसे दिले काही वेळातच जन्मदात्या बापाला संपवलं, एक कारण अन् टोकाचा निर्णय

Palghar Crime News: पालघरमधील बोरशेती-अस्वालीपाडा येथे दारूच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका धक्कादायक घटना घडली आहे. कमी पैशांवरून वडिलांनी शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या मुलाने टोकाचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पालघर : पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोटच्या मुलानेच बापाचा जीव घेतला. ही घटना घटना बोरशेती- अस्वालीपाडा येथे घडली आहे. दारू पिण्यासाठी कमी पैसे दिल्याने वडिलांना मुलाला शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर काही वेळान मुलाने जन्मदात्या वडिलांची गळफास घेत हत्या केली. लक्ष्मण गोरखाना असे मृत पित्याचे नाव आहे.

पालघर तालुक्यातील नागझरी- बऱ्हाणपूर मार्गावर बोरशेती- अस्वलीपाडा येथे लक्ष्मण मुकुंद गोरखाना आपल्या कुटुंबासोबत राहत होते. सोमवारी दुपारच्या सुमारास शेतात काम करून लक्ष्मण गोरखाना घरी परतले. त्यानंतर त्यांनी मुलगा सुरेश याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सुरेश याने वडिल लक्ष्मण गोरखाना यांना दारू पिण्यासाठी दहा रुपये दिले. वडील लक्ष्मण गोरखाना दारू पिऊन घरी परतल्यानंतर मुलगा सुरेश याने त्यांना दारू पिण्यासाठी फक्त दहा रुपयेच दिल्याने सुरेशला शिव्या देण्यास सुरुवात केली. वडिलांनी शिव्या दिल्याचा राग मुलगा सुरेश याला आल्याने त्याने घरातील भाताचे भारे बांधण्याच्या दोरीने वडिल लक्ष्मण गोरखाना यांची गळा आवळून हत्या केली.

कुटुंबीयांनी त्यानंतर लक्ष्मण गोरखाना यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष्मण गोरखाना यांना तेथे मृत घोषित केले. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश गोरखाना याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मुलाला राग अनावर झाल्याने त्याने रागाच्या भरात वडिलांना खून केला. त्याचा राग त्याला महागात पडला, वडिलांचा मृत्यू झालाच त्यासोबतच आता तोसुद्धा तुरूंगात खडी फोडायला गेला. मराठीमध्ये एक म्हण आहे, राग आणि भीक माग, या म्हणीप्रमाणेच आता सुरेश त्याच्या आयुष्यात शून्य झाला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा राग आला तर शांतपणे त्याचा विचार करत वेगळा काही मार्ग काढता येईल याचा विचार करावा. नाहीतर क्षणिक राग तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही.

Source link

crime newsPalgharpalghar crimeपालघरपालघर क्राईमपालघर मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment