विनयभंगाच्या तक्रारीमुळे अभ्यास होत नाही; उच्च न्यायालयात तरुणीचं अजब शपथपत्र, प्रकरण काय?

Nagpur News: तरुणी आता लग्नाच्या वयात येत आहे. त्यामुळे प्रकरण प्रलंबित राहिले तर याचा परिणाम तिच्या लग्नावरही होऊ शकतो, असे तिच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स
sad girl

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नंदनवन परिसरातील एका तरुणीने पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली. तक्रारीच्या आधारावर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. ‘मी यूपीएससीची तयारी करीत आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून मला प्रचंड मानसिक त्रास होतो आहे. त्यामुळे ही तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे’, असे या तरुणीने न्यायालयाला शपथपत्राद्वारे सांगितले आहे.

हा गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्या. विनय जोशी आणि न्या. अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही २३वर्षीय तरुणी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे वडील पोलिस विभागात कार्यरत आहेत. या प्रकरणातील आरोपी आणि वडिलांचे मित्रही पोलिस विभागात असल्याने ते वारंवार घरी येत होते आणि त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले. वडिलांचे हे मित्र आपल्याला आक्षेपार्ह संदेश पाठवायचे, फोन करून वारंवार त्रास द्यायचे, अशी तक्रार या तरुणीने नंदनवन पोलिस ठाण्यात केली. यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल.

दरम्यान, ही याचिका दाखल झाल्यावर तरुणीने न्यायालयात शपथपत्र दाखल केले. या प्रकरणामुळे मानसिक अवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे हे प्रकरण चालवू इच्छित नाही, असे तरुणीचे म्हणणे आहे. याशिवाय, तरुणीने बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची (यूपीएससी) तयारी करत आहे. या प्रकरणामुळे ती यूपीएससीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. याचिका निकाली काढली तर ती परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करू शकेल, असे तिने न्यायालयाला सांगितले.
विधानसभेसाठी भाजपची जोरदार प्लॅनिंग; मतदारसंघातील विजयाच्या शक्यतेनुसार आखली ‘रंगीत’ रणनीती
तरुणीच्या आईवडिलांनीही याप्रकरणी न्यायालयात मत नोंदविले. तरुणी आता लग्नाच्या वयात येत आहे. त्यामुळे प्रकरण प्रलंबित राहिले तर याचा परिणाम तिच्या लग्नावरही होऊ शकतो, असे तिच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने सर्व बाबी लक्षात घेता आरोपी पोलिस कर्मचाऱ्यावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. यासह आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या फोनमधील सर्व आक्षेपार्ह सामग्री तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नष्ट करण्यात यावी, असेही निर्णयात स्पष्ट केले.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly electionsMaharashtra Civil Service Actmaharashtra electionsआचारसंहिता भंगउच्च शिक्षण विभागनागपूर खंडणी प्रकरणनागपूर बातम्याविधानसभा निवडणुका २०२४
Comments (0)
Add Comment