राज ठाकरेंच्या मदतीची परतफेड होणार? उद्धव काकांनी ठरवलं! अमित ठाकरेंच्या बाबत मोठा निर्णय

Amit Thackeray : माहीममध्ये ठाकरे कुटुंबाच्या एका कृत्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील अनेक रंगतदार लढतींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. नात्यागोत्यातील सामनेही लक्षवेधी ठरत आहेत. पवार काका-पुतण्यामधील सामना जितका रंजक आहे, तितकाच ठाकरे कुटुंबातील एकमेकांविरोधातील अप्रत्यक्ष मुकाबलाही. वरळीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिला आहे, तर माहीममध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार आहे. परंतु माहीममध्ये ठाकरे कुटुंबाच्या एका कृत्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजप कुणाच्या पाठीशी?

माहीममध्ये महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर पुन्हा रिंगणात आहेत. सरवणकरांवर माघारीसाठी भाजपकडून प्रचंड दबाव आल्यानंतरही ते मागे हटले नाहीत. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत निश्चित आहे. आता भाजपने आपला पाठिंबा महायुतीतील शिवसेनेला जाहीर केला आहे, मात्र छुपी ताकद अमित ठाकरेंच्या पाठीशी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माहीममध्ये प्रचारसभा नाही

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीममध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रचारसभांचे वेळापत्रक समोर आले आहे. मात्र माहीम मतदारसंघात ठाकरे पितापुत्रांपैकी कोणाचीही तोफ धडाडणार नसल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कसारखे ठाकरे कुटुंबासाठी महत्त्वाचे मैदान असतानाही तिथे त्यांनी प्रचारसभा घेणं टाळल्याचं दिसत आहे.

Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या मदतीची परतफेड होणार? उद्धव काकांनी ठरवलं! अमित ठाकरेंच्या बाबत मोठा निर्णय

गेल्या वेळी आदित्य ठाकरेंच्या पहिल्या निवडणुकीला मनसेने त्यांच्याविरोधात उमेदवार न देत राज ठाकरेंनी काकांचं कर्तव्य बजावलं होतं. आता अमित ठाकरेंविरोधात कुठलाही प्रचार न करता उद्धव ठाकरे आपल्या पद्धतीने काकांचं कर्तव्य बजावणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत.
Jalgaon News : भाजपविरोधातील बंडखोरांना हाकललं, शिवसेनाविरोधातील बंडखोर पक्षातच, माजी खासदाराला भाजपचं अभय?

ठाकरेंच्या मुंबईत सभा कधी?

दरम्यान, उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मुंबईतील पहिली जाहीर सभा ६ नोव्हेंबरला बीकेसी मैदानात पार पडली. आता उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची सांगता सभा १७ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता आणि १८ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता पुन्हा बीकेसी मैदानात होणार आहे.
Nandurbar Politics : गावितांचं अख्खं कुटुंबच निवडणुकीच्या रिंगणात; एक बंधू भाजपकडून, एक काँग्रेसकडून, लेक अपक्ष

आदित्य ठाकरेंचाही माहीम वगळून प्रचार

आदित्य ठाकरेही मुंबईच्या विविध मतदारसंघात प्रचार दौरा करणार आहेत. परंतु माहीम मतदारसंघात त्यांचा कुठलाही दौरा नियोजित नाही. वडाळा, शिवडी, भायखळा, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व हा सर्वच आजूबाजूचा पट्टा कव्हर करणाऱ्या आदित्य दादाने माहीम-दादरचा भाग जाणूनबुजून वगळल्याचेही बोलले जात आहे.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Amit Thackerayraj thackeraysada sarvankarUddhav ThackerayVidhan Sabha Nivadnukअमित ठाकरे प्रचारसभाआदित्य ठाकरेउद्धव ठाकरे प्रचारसभामाहीम ठाकरे गट प्रचार नाहीमाहीम विधानसभा
Comments (0)
Add Comment