‘पंचसूत्री’साठी पैसे कुठून आणणार? अजित पवार यांचा ‘मविआ’ला प्रश्न; म्हणाले जादूची कांडी…

Ajit Pawar Criticized On MVA Panchasutri: गुरुवारी नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान अजित पवार यांनी मविआवर सडकून टीका केली.

महाराष्ट्र टाइम्स
ajit pawar

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘महायुतीच्या लाडकी बहीण, वयोश्री या योजनांसाठी सध्या ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु तरीही महाविकास आघाडीचे नेते हे पैसे कुठून आणणार? तिजोरी रिकामी केली असा प्रचार करीत आहेत. मविआनेच जाहीर केलेल्या पंचसूत्रीतील योजना खरेच प्रत्यक्षात आणायच्या असतील, तर त्यासाठी दर वर्षी तीन लाख कोटी रुपये लागतील, हे पैसे ते कुठून आणणार आहेत,’ असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी उपस्थित केला आहे.

बीकेसी मैदानात झालेल्या प्रचारसभेत ‘मविआ’ने बुधवारी पंचसूत्री जाहीर केली. यात महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला दरमहा तीन हजार रुपये, महिला-मुलींना राज्यभर मोफत बसप्रवास, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपयांपर्यंतची मदत अशा घोषणा केल्या. त्यावर, गुरुवारी नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान अजित पवार यांनी मविआवर सडकून टीका केली.

‘महायुती सरकारने जेव्हा जनतेसाठी योजना घोषित केल्या, तेव्हापासून आतापर्यंत इतके पैसे कुठून आणणार, राज्यात वेतन देण्यासाठीही पैसे उरणार नाही असा प्रचार सुरू झाला. ते असे म्हणत असताना लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते थेट हस्तांतरित करण्यात आले. आता मविआने पंचसूत्री जाहीर केली. महिलांना बसप्रवास फुकट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी ज्या योजना जाहीर केल्या त्यांची पूर्तता करायची असेल तर दरवर्षाला तीन लाख कोटी रुपये लागतील. इतके पैसे कुठून आणणार, त्याचे नियोजन काय याविषयी मविआ नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावे,’ असेही पवार म्हणाले. ‘लोकांशी खोटे बोलून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार मविआ करीत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
Raj Thackeray: मनसेला सत्ता द्या, ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो! वरळीतील सभेत राज ठाकरे यांची घोषणा
मविआनेच जाहीर केलेल्या पंचसूत्रीतील योजना खरेच प्रत्यक्षात आणायच्या असतील, तर त्यासाठी दर वर्षी तीन लाख कोटी रुपये लागतील, हे पैसे ते कुठून आणणार आहेत?– अजित पवार, उपमुख्यमंत्री

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Ajit Pawar Criticized On MVA Panchasutribkc speechmaharashtra vidhan sabha nivadnuk 2024mva panchasutrimva politics in maharashtrapanchasutri scemeपंचसूत्री योजनामहायुती सरकारमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment