saturn retrograde In aquarius : ज्योतिषशास्त्रानुसार १५ नोव्हेंबरला शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत अर्थात कुंभ राशीत जाणार आहे. सध्या शनि कुंभ राशीत आहे. परंतु, तो पुन्हा मार्गक्रमण करेल. शनिच्या मार्गक्रमणामुळे काही राशींना सावध राहावे लागणार आहे. शनीचे कुंभ राशीत थेट मार्गीक्रमण झाल्यामुळे कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल जाणून घेऊया
ज्योतिषशास्त्रानुसार १५ नोव्हेंबरला शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत अर्थात कुंभ राशीत जाणार आहे. सध्या शनि कुंभ राशीत आहे. परंतु, तो पुन्हा मार्गक्रमण करेल. शनिच्या मार्गक्रमणामुळे काही राशींना सावध राहावे लागणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्मदाता, न्यायदाता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे काही राशींना सावध राहावे लागणार आहे. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी तरी शनिच्या साडेसातीला, ढैय्या किंवा महादेशाला सामोरे जावे लागते. ग्रहांनुसार शनि हा सर्वात संथ ग्रह मानण्यात आला आहे. त्याच्या बदलत्या चक्रामुळे प्रत्येक राशीवर वेगवेगळे प्रभाव पडतात. शनीचे कुंभ राशीत थेट मार्गीक्रमण झाल्यामुळे कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल जाणून घेऊया
सिंह राशीवर शनि मार्गीक्रमणाचा प्रभाव
सिंह राशीत शनी सातव्या घरात असणार आहे. सहाव्या आणि सातव्या घराचा स्वामी असल्यामुळे या राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागेल. या राशीच्या लोकांचा मित्रांसोबत काही मुद्द्यांवर मतभेद होतील. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. काम ओझ्याखाली दबून जाईल. या काळत नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात तुम्हाला सावध राहावे लागेल. पार्टनरशीपमध्ये काही गोष्टींवरुन वाद होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशीवर शनि मार्गीक्रमणाचा प्रभाव
वृश्चिक राशीत शनि चौथ्या घरात असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सावध राहाणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला ताण सहन करावा लागेल. या काळात नवीन व्यवसाय सुरु करु नका, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. अनावश्यक खर्चामुळे त्रास होईल. घरच्यांशी मतभेद वाढतील
मकर राशीवर शनि मार्गीक्रमणाचा प्रभाव
मकर राशीत शनि दुसऱ्या स्थानात असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या राशीच्या लोकांना अनावश्यक खर्चाची चिंता करावी लागेल. व्यवसायात काही अडचणी येतील. प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल. अनावश्यक खर्चामुळे त्रास होईल. लव्ह लाईफमध्ये गडबड होईल.