Palghar News: विक्रमगड विधानसभेत महायुतीत झालेल्या या बंडखोरीमुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे पहावयास मिळाले आहे. महायुतीच्या वतीने प्रकाश निकम यांना पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
हायलाइट्स:
- विक्रमगड विधानसभेतील बंडखोरीवरून भाजप-शिवसेना शिंदे गटात वाद
- बंडखोर व त्यांच्या प्रचारात सक्रिय शिंदे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी
- बोईसर विधानसभेत शिंदे गटाच्या उमेदवाराचे काम न करण्याचा भाजप जिल्ह्याध्यक्षांचा इशारा
विक्रमगड विधानसभेत महायुतीत झालेल्या या बंडखोरीमुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे पहावयास मिळाले आहे. महायुतीच्या वतीने प्रकाश निकम यांना पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. प्रकाश निकम यांनी बंडखोरी केली असून त्यांचा पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात यावा आणि पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे निकम यांच्यासोबत प्रचारात सक्रिय असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समज देऊन त्यांच्यावर कारवाई करावी. याबाबत शिवसेना शिंदे गटाने योग्य कारवाई न केल्यास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पालघर आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार आणि शिंदे गटाच्या उमेदवारासाठी काम करणार नाहीत, असा इशाराच भाजप जिल्हाध्यक्षांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या पालघर जिल्हाध्यक्षांच्या या इशाऱ्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात सारे अलबेल नसल्याचं दिसून आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच वादाची ठिणगी पडली असून दोन्ही पक्षातील वाद उफाळून वर आला आहे.