Dharashiv Madhukar Chavan: सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी मधुकर चव्हाण यांच्याशी चर्चा केली असून ते नाराज नाहीत, असं आमदार अमित देशमुख यांनी सांगितले.
हायलाइट्स:
- काँग्रेसच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात मिठाचा खडा
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांची दांडी
- कार्यकर्त्यांमध्ये भलतीच कुजबूज
दरम्यान, माजी मंत्री मधुकर चव्हाण हे आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होते. महाविकास आघाडीमध्ये वाटाघाटी दरम्यान तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सुटला आहे. काँग्रेस पक्षातून माजी मंत्री मधुकर चव्हाण हे इच्छुक होते, त्यांनी दोन उमेदवारी अर्ज देखील घेतले होते. तसेच, विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद धाराशिवचे माजी अध्यक्ष एडव्होकेट धीरज कदम पाटील हे सुद्धा इच्छुक होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्या ऐवजी जिल्हाध्यक्ष एडव्होकेट धीरज कदम पाटील यांना संधी दिल्याने मधुकर चव्हाण हे नाराज झाले होते. कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढून आम्ही तुमचं सन्मानाने राजकीय पुनर्वसन करु असं अश्वासन दिलं. त्यानंतर मधुकर चव्हाण यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला.