Raj Thackeray Ratnagiri Guhagar Sabha Highlights for Vidhan Sabha Election : सभेमधील या बॅनरची राज ठाकरे यांनी भाषण सुरु असताना दखल घेतल्याने उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्या ठोकत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राज ठाकरे काय म्हणाले?
आता ही चिमुरडी येथे बॅनर घेऊन उभी आहे. पाच वर्षांनी ती केवढी असेल? वय कोणासाठी थांबत नाही. अनेक बुजुर्ग मंडळी येथे असतील. या निवडणुका जर पाच वर्षांनी येतात. किती वर्षे आपण त्याच त्याच विषयावर निवडणूक लढवणार? असा खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी व्यासपीठावर मनसे नेते अभ्यंकर, वैभव खेडेकर गुहागर येथील उमेदवार प्रमोद गांधी, दापोलीचे उमेदवार संतोष अबगुल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, आमच्याकडे कोकणातले तरुण-तरुणी इकडे काही नोकरी उद्योगधंदे नसल्यामुळे मुंबई पुण्याकडे निघून जातात आणि मुंबई पुण्यातले तिकडे काही नसल्याने परदेशात निघून जातात. मला काही कळतच नाही. कारण आमच्याकडे काही येतच नाही, काय येतं तर पॉवर प्रोजेक्ट येतात, रिफायनरी येतात, पण जे परमेश्वराने आमच्या पुढ्यात वाढून ठेवलं आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारच्या कोकणाबाबतच्या औद्योगिक धोरणावर ताशेरे ओढले आहेत
सगळीकडे ऐकतोय, तर हेच आहे. मराठवाड्यात गेलो तरी हेच, विदर्भात गेलो तरी हेच, मला सांगतात हेच ऐकायला मिळतं. तिकडेही आमच्याकडे काही उद्योगधंदे येत नसल्यामुळे मुंबई पुण्याला तरुण-तरुणी निघून जातात, असे सांगतात. कोकणाला इतका विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे, निसर्गाने भरभरुन दिलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.
शाहरुख खान सलमान खानचे चित्रपट पडले ना शुक्रवारी, तर ते सोमवारी पुन्हा नवीन आणू शकतात. पण निवडणुकांमध्ये एकदा पडले की पाच वर्षांनी या, पुन्हा पाच वर्षांनी या निवडणुका येतात, निवडणूक आल्या की सगळे सांगतात मी हा उद्योग आणीन रोजगार निर्मिती करेन, अरे मग आतापर्यंत का नाही आणला? असा सवाल उपस्थित करत हे सगळं कशामुळे होतं? तर तुम्ही या लोकांना प्रश्न विचारत नाही, म्हणून होतं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सुनावलं आहे.