वडगावशेरी: इथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत जशी तुम्हाला इथली माहित आहे तशी आम्हाला…. त्यामुळे जुने काही बोलू नका आणि जर काढलंच तर ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना निर्वाणीचा इशारा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार बापू पठारे यांना दम भरल्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित दादांच्या विरोधात केलेले आतापर्यंतचे सर्वात आक्रमक भाषण ठरले आहे.
मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होते, तेव्हा असे काय होईल असे कधीच वाटले नव्हते. मागच्या वेळेस ज्या व्यक्तीला तिकीट दिले त्याच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांची सही आहे, म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट शरद पवार यांनी दिले त्यानंतर त्या व्यक्तीने काय केले हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे.
लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा