Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk: पुण्यातील वडगाव शेरी येथे झालेल्या सभेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. या मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे विरुद्ध शरद पवार गटाचे बापू पठारे यांच्यात लढत होत आहे.
मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होते, तेव्हा असे काय होईल असे कधीच वाटले नव्हते. मागच्या वेळेस ज्या व्यक्तीला तिकीट दिले त्याच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांची सही आहे, म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट शरद पवार यांनी दिले त्यानंतर त्या व्यक्तीने काय केले हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे.
काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केले की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी… आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही माझे हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला.
सुनील टिंगरेंना आव्हान
पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी शरद पवारांनी बोलू नये यासाठी टिंगरे यांनी नोटीस दिली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार दिल्लीच्या तक्ताला ईडीच्या नोटीसला घाबरले नाही तर ते तुमच्या नोटीसला काय घाबरणार. तुम्हाला काय करायचे आहे ते करून घ्या असे सांगत सुप्रिया सुळेंनी थेट सुनील टिंगरेंना आव्हन दिले.
काय म्हणाले होते अजित दादा
अजित पवारांनी बापू पठारे यांना सज्जड दम भरत तुझ्याकडे बघून घेईन. आम्ही काह हातात बांगड्या भरल्या आहेत का? बघून घेऊ. आरे ला कारे म्हणायची ताकद आमच्याकडे देखील आहे. ते दम भरतात, पण त्यांना आमदार मी केले आहे. त्यामुळे त्यांचे अंडी पिल्ले सगळी मला माहिती आहेत.