Supriya Sule in Vadgaon Sheri: विधानसभा निवडणुकीतील प्रचारात आरोप प्रत्यारोप होत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितले.
पोर्शे कार दुर्घटनात ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत. इथल्या स्थानिक नेत्यांनी पोर्शे कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे. ज्यांनी पोर्शे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत केली त्याच नेत्यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे की, तुम्ही या दुर्घटनेच्या केस मध्ये माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. मी त्या नेत्याला आव्हान देते की, मी एकदा नाही तर शंभर वेळा ज्यांनी त्या दोन युवकांची हत्या केली त्यांची मदत करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात बोलणार. तुमच्यात हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना देखील नोटीस पाठवाच, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी टिंगरे यांना केले.
बापू मला तुमच्याकडून आज एक शब्द हवाय. तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघात एकही अपघात झाला, तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही; तुम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये जाल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताचे सॅम्पल बदलायचे पाप तुमच्या सरकारने केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.