बाबा सिद्दीकींवरील हल्ला फसला असता तर… आरोपींनी सांगितला प्लॅन बी

एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या गौरव अपुने याने खुलासा केला की, सिद्दीकी यांच्या हत्येचे दोन प्लॅन होते. गौरव आणि त्याचा साथीदार रूपेश मोहोळ यांना झारखंडमध्ये गोळीबाराचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यासोबतचे त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Baba Siddiqui case

मुंबई : एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून हा गोळीबार करण्यात आला. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्यावर भर रस्त्यामध्ये गोळीबार करण्यात आला. या हत्येनंतर मोठी खळबळ झाली. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आलंय. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून सलमान खानला देखील सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची प्लनिंग गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होते. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अत्यंत हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने गौरव विलास अपुने याला दोन दिवसांपूर्वीच पुण्यातून अटक केलीये. पोलिस चाैकशीमध्ये गौरव याच्याकडून काही मोठे खुलासे आता करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी दोन प्लॅन तयार करण्यात आले होते. एक प्लॅन फसला तर लगेचच दुसरा बॅकअप प्लॅन तयार होता. प्लॅन बीसाठी गौरवला झारखंडमध्ये फायरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. गौरव याच्यासोबत रूपेश मोहोळ हा देखील झारखंडला गेला होता.
‘लॉरेन्स बिश्नोई गँगकडून बोलतोय’…थेट दिली फेसबुक फ्रेंडला धमकी आणि…
झारखंडमध्ये या दोघांना राऊंड फायरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या दोघांना शुभम लोणकर यानेच सरावासाठी पाठवले होते. या दोघांना शस्त्रेही पुरवण्यात आली होती. मात्र, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना अजूनही झारखंडमधील ते प्रशिक्षण केंद्र शोधण्यात यश मिळाले नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, गौरवला झारखंडमध्ये फायरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तो बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी प्लॅन बीमध्ये सहभागी होता.

बाबा सिद्दीकींवरील हल्ला फसला असता तर… आरोपींनी सांगितला प्लॅन बी

गौरव अपुने आणि रूपेश मोहोळ या दोघांनी झारखंडला 28 जुलै रोजी फायरिंगचे प्रशिक्षण घेतले आणि ते 29 जुलैला परत पुण्यात आले. त्यानंतर हे दोघे सतत शुभम लोणकर याच्या संपर्कात होते. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अनेक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक बॉलिवूड कलाकार देखील बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती.

Source link

baba siddiquibaba siddiqui caseआरोपीबाबा सिद्दीकी हत्यामोठा खुलासा
Comments (0)
Add Comment