Akbaruddin Owaisi on Uddhav Thackeray : याआधी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यानेही ठाकरे-फडणवीस एकत्र होण्याचे दावे केले होते. त्यामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राऊत-नड्डा, ठाकरे-फडणवीस भेटीगाठी
याआधी, वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की, शिवसेना खासदार संजय राऊत हे २५ जुलै रोजी रात्री दोन वाजता ७ डी मोतीलाल मार्ग इथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले होते. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगला येथे गेले, दोन तास त्यांची बैठक झाली, असा आरोप सिद्धार्थ मोकळे यांनी केला होता.
केंद्र सरकारवरही निशाणा
दरम्यान, समान नागरी कायदा (यूसीसी) आणण्याच्या केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या प्रयत्नावरही एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी हल्ला चढवला. त्याऐवजी ‘एकसमान विकास संहिता’ आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरे विधानसभेनंतर भाजपकडे परत जाणार नाहीत, याची काय खात्री?’
सब का साथ सब का विकासवरुन हल्लाबोल
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या घोषणेवरुन अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. ओवेसी म्हणाले की, लव्ह जिहाद, बीफ बंदी, हिजाब बंदीची मागणी यासारख्या गेल्या १० वर्षांतील अनेक गोष्टींवरुन ही केवळ पोकळ घोषणा असल्याचे दिसून येते.
अमित शहांचा समाचार
“शेतकऱ्यांची जमीन वक्फ बोर्डाला देण्यात आली होती” या टिप्पणीबद्दल ओवेसींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ओवेसी म्हणाले, “कुणाकडे स्वतःच्या मालकीची कागदपत्रे असतील, तर कुणीही दुसऱ्याची जमीन अशाप्रकारे घेऊ शकत नाही.