आमदाराला १५ वर्षातील कामाचा जाब विचारल्याने कार्यकर्त्यांची हाणामारी; Video व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar Prashant Bamb Fights in Sabha: गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत बंब यांचा प्रचार सुरू आहे. प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे गेल्या १५ वर्षापासून आमदार आहेत.

हायलाइट्स:

  • १५ वर्ष आमदार म्हणून काय काम केलं?
  • सभेमध्ये तरुणांचा प्रशांत बंब यांना सवाल
  • कार्यकर्त्यांनी तरुणांना केली मारहाण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
प्रशांत बंब

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सभेत दोन तरुणांनी बंब यांना तुम्ही १५ वर्ष आमदार होतात, तर तुम्ही काय काम केलं? असा प्रश्न विचारला असता यावरुन सभेत गोंधळ झाला. तर विरोधक मुद्दामून अशी काही लोक पाठवून सभेत वारंवार गोंधळ घालत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत बंब यांचा प्रचार सुरू आहे. प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे गेल्या १५ वर्षापासून आमदार आहेत. दरम्यान, प्रशांत बंब यांची गंगापूर खुलताबाद मतदार संघामध्ये कॉर्नर सभा सुरू असताना काही तरुणांनी त्यांना प्रश्न विचारला. तुम्ही १५ वर्षे या मतदारसंघाचे आमदार होतात. तुम्ही काय काम केलं? असा प्रश्न त्यांनी बंब यांना भर सभेत विचारला. अनपेक्षित प्रश्नामुळे प्रशांत बंब यांनी त्यावर उत्तर दिलं. ते म्हणाले की, ”मी आमदार नसलो तर तू मरेपर्यंत पस्तावशील. मी आमदार नसलो तर हे लोकं हालत खराब करतील तुमची”. इथे लोक शांत बसलेले आहेत तू मुद्दाम इथे दादागिरी करत आहेस आणि यांना बाहेर काढा” असं म्हणत बंब यांचे कार्यकर्ते त्या तरुणांवर तुटून पडले.
Sanjay Raut : अमित ठाकरे माहिमशिवाय अन्यत्र उभे असते, तर चर्चा नक्कीच झाली असती : संजय राऊत

रेल्वे आणू असं तुम्ही म्हंटलं होतं, त्याचं काय झालं? असा प्रश्न तरुणांनी विचारला असता यावरुन सभेत गोंधळ झाला. यावर बंब यांनी उत्तर दिलं, मात्र तरीही तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं सभेला उपस्थित नागरिक आणि तरुण यांच्यामध्ये वाद आणि धक्काबुक्की झाली. काही काळानंतर वातावरण शांत झालं. यावेळी प्रशांत बंब यांना प्रश्न विचारला असता, विरोधक मुद्दामून अशी काही लोक गेल्या काही दिवसांपासून पाठवत आहेत. सभेत वारंवार गोंधळ घालून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं प्रशांत बंब म्हणाले.

दरम्यान, यापूर्वीही प्रशांत बंब यांच्या सभेत गदारोळ झाला आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील वेरूळमध्ये हा प्रकार काल घडला. यावेळी बराच गोंधळ उडाला आणि प्रकरण बाचाबाचीपर्यंत पोहोचले. खुलताबाद तालुक्यात निवडणूकीचे वातावरण चांगलंच तापलं आहे. तालुक्यातील सराई-सालुखेडा, वेरुळ, कसाबखेडा येधील प्रचार दौऱ्यात आमदार प्रशांत बंब यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत नागरिक त्यांना १५ वर्षांचा लेखाजोखा मागितला होता. त्यावेळीही मोठा गदारोळ झाला होता.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

chhatrapati sambhaji nagarMaharashtraprashant bambVidhan Sabha Election 2024गंगापूर-खुलताबाद मतदारसंघछत्रपती संभाजीनगरप्रशांत बंबविधानसभा निवडणूक 2024
Comments (0)
Add Comment