BJP Leader Sudhakar Khade Murder: मनसेचे माझी जिल्हाध्यक्ष आणि भाजप नेते सुधाकर खाडे यांनी हत्या करण्यात आली आहे. सांगलीत त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
सुधाकर खाडे यांच्यावर वार झाल्यानंतर त्यांनी जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतील त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मिरज पोलिसांचे पथक दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी खाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.