Sada Sarvankar on Mahim Vidhan Sabha : शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यावर भाजप नेत्यांकडून माघार घेण्यासाठी दबाव होता.
शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यावर भाजप नेत्यांकडून माघार घेण्यासाठी दबाव होता. माहीममध्ये महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा देऊन विजयाचा मार्ग सुकर करावा अशी देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यापासून आशिष शेलार, प्रसाद लाड यांची इच्छा होती. सदा सरवणकर यांनी जनतेशी संवाद साधताना पहिल्यांदाच माघार न घेण्याचं कारण सांगितलं.
सदा सरवणकर काय म्हणाले?
उमेदवारी मागे घ्यावी म्हणून प्रचंड मोठे दबाव, राजकीयच नाही तर वेगवेगळ्या दृष्टीचे दबाव माझ्यावर आणले जात होते. माझी भावना हीच होती, की या मतदारसंघातील जी सर्वसामान्य जनता आहे, मी थांबलो, तर त्यांच्यासाठी कोण धावणार कोण? जातीपातीचं नुसतं राजकारण करायचं, आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा हे काम करणारे लोक समोर उभे आहेत.
Sada Sarvankar : उमेदवारी मागे घेण्याचा प्रचंड मोठा दबाव, सरवणकरांनी पहिल्यांदाच माघार न घेण्याचं कारण सांगितलं
म्हणून अनेक मतदारांचे फोन यायचे, की काय वाटेल ते झालं तरी चालेल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आपण माघार घ्यायची नाही, मला वाटतं की हीच माझी ताकद, हीच माझी शक्ती आहे, म्हणून मी माघार घेतली नाही, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी कधी माघार घेत नाही, असं सरवणकर म्हणाले.
दरम्यान, सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी खूप दबाव आणला गेला, केवळ राजकीय नव्हे तर इतर पद्धतीनेही. मात्र, त्यांनी ठामपणे ठरवले की लोकांसाठी उभे राहणे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही, त्यामुळेच आज बरेच मतदार त्यांच्या पाठीशी आहेत. बाळासाहेबांचे आदर्श जपणारे आणि लोकांच्या हितासाठी सदा कणखर असणारे खरे शिवसैनिक म्हणजे सदा सरवणकर, असं कॅप्शन देत त्यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.