Mallikarjun Kharge Counter Attack on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात प्रचाराचा शंख फुंकला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
नरेंद्र महात्मा गांधींवरील टीकेला प्रत्युत्तर देताना खर्गे म्हणाले ‘एक मुख्यमंत्री बटेंगे तो कटेंगे असं म्हणतात, एक है सेफ है म्हणतात, पण कुणाला तोडायचं आहे. देशाला एक ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जीवन दिलं आहे. महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच आहात. खोटे बोला पण रेटून बोला असं मोदींचं आहे.
खर्गे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत. ज्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. बेरोजगारी, शेतकरी समस्या, तरुण, नशेची समस्या, महिला सुरक्षित नाही. पण भाजप सरकार आले, तर प्रशासन चांगलं चालत नाही. मात्र आम्हाला या निवडणुकीत महाराष्ट्राला पुन्हा प्रगती पथावर आणायचं आहे.’ तर ‘भाजपने ‘आमचे आमदार चोरी करुन सरकार स्थापन केलं.’ अशी टीकाही खर्गे यांनी केली.
दरम्यान मोदींच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरील टीकेवरूनही खर्गे कडाडले आहेत. खर्गे म्हणाले, ‘ते म्हणाले काँग्रेस नेते भडकवणारे भाषण देतात आणि लोकांचे लक्ष विचलित करतात. तसेच कर्नाटकात योजनांची अंमलबजावणी नाही असा आरोप करतात. पण मोदीजी यांनी कर्नाटकामधील बजेट एकदा वाचावं. कर्नाटकात वीज सवलत योजनांसाठी ९ हजार कोटींची तरतूद आहे. कर्नाटकात महिलांना बसेस फ्री असून पाच हजार १५ कोटींची तरतुद केली आहे. कर्नाटकात गृहलक्ष्मीसाठी कर्नाटकात दोन हजार एक महिलेला दिले जात आहेत, यासाठी २८ हजार ६०८ कोटींची तरतूद केली आहे. असे असताना ते खोटं बोलातात, मोदी तर खोटे बोलणाऱ्यांचे सरदार आहेत.
‘संघ योगींसोबत आहे, योगी संघाची लाईन बोलत आहेत. संविधान संरक्षण कुणाला नकोय. लाल संविधान म्हणाले, शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रपतींना तेच लाल संविधान मोदीजी यांनी भेट दिले आहे, यावेळी त्यांनी लाल संविधान दाखवलं, असेही खर्गे म्हणाले आहेत.