शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

Prakash Ambedkar Allegation on Sharad Pawar: वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी ते सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकार परिषदेतून मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत.’ याबाबतचा व्होरा कमिटीचा रिपोर्ट का समोर आला नाही, असा सवाल देखील आंबेडंकरांनी उपस्थित केला.

Lipi

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी ते सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकार परिषदेतून मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत.’ व्होरा कमिटीचा रिपोर्ट समोर का आला नाही, त्याबाबत अनेक खुलासे समोर आले असते. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत की नाहीत याबाबत अधिक माहिती घ्यावयाची असल्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून घ्यावी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमधील वंचितच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या आधी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
Santosh Bangar: नाही देणार आम्ही मत…चला जा..! संतोष बांगरांच्या पत्नीला नागरिकाचं सडेतोड उत्तर, Video व्हायरल

‘देवेंद्र फडणवीसांनी संविधानाचा मूळ रंग सांगावा’

राहुल गांधी महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या सभेमध्ये लाल रंगाचं संविधान दाखवत भाषण केले आहे. लाल रंगाच्या संविधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताच आता राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणीचा खेळ रंगला आहे. यातच प्रकाश आंबेडकरांनीही आता देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले आहे. ‘संविधानाचा मूळ रंग काय आहे ते फडणवीसांनी सांगावे,’ असे आंबेडकर म्हणाले.

‘मुंबईची मराठी लोकसंख्या कमी करण्यास शिवसेना जबाबदार’

मुंबईतील मराठी लोकसंख्या कमी होण्यामागे मुख्य म्हणजे शिवसेना कारणीभूत आहे. कारण मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता अनेक वर्षांपासून आहे.
मुंबई महानगरपालिकेत अनेक काँन्ट्रॅक्टर हे बिगर मराठी आहेत. मुंबईतील मोठी मोठी कामे परराज्यातील ठेकेदारांना दिल्यामुळे आपोआप स्थायिक झाले आणि मुंबईतील मराठी व्यक्ती कमी होत गेला. मी स्वतः मुंबईकर आहे, याला मी साक्षीदार आहे, अशी माहिती देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

dawood ibrahimmh vidhan sabha nivadnukPrakash Ambedkarsharad pawar ncpSushilkumar Shindevanhit Bahujan aghadiदाऊद इब्राहिमसोबतचे शरद पवारांचे संबंधप्रकाश आंबेडकरांचे विधानवंचित बहुजन आघाडीची ताकदशरद पवारांवर टीकासुशीलकुमार शिंदेंबद्दल दावा
Comments (0)
Add Comment