निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, पालघरमध्ये तब्बल इतक्या कोटींची रोकड जप्त; पोलिसही…

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पालघरमध्ये पोलिसांनी एक कार जप्त केली आहे. कारमधून ३ कोटी ७० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हायलाइट्स:

  • महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई
  • एका कारमधून 3 कोटींहून अधिक रोकड जप्त
  • पालघरमधील धक्कादायक प्रकार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पालघर तीन कोटींची रक्कम जप्त

पालघर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत निवडणुकांच्या घोषणेबरोबरच राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यानंतर सर्व तपास यंत्रणा आणि पोलीस राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी पालघरमधील एका वाहनातून तीन कोटींहून अधिक रोकड जप्त करून आरोपीला अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरच्या वाडा पाली मार्गावरून विक्रमगडच्या दिशेने जाणाऱ्या एका कारवर पोलिसांना संशय आला. यानंतर कार थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संशय वाढल्याने कार वाडा पोलिस ठाण्यात आणून तपास करण्यात आला. तपासादरम्यान कारमधून सुमारे 3 कोटी 70 लाख रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Mahim Online Poll : सरवणकर म्हणाले तिहेरी लढतीत अमित ठाकरेंना फायदा, ऑनलाईन पोलचा धक्कादायक अंदाज, फक्त १२ टक्के…

मुंबईत 2 कोटी 30 लाख रुपये सापडले

मुंबईतही 2 कोटींहून अधिक रोख रकमेसह 12 जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जात असल्याची गुप्त माहिती एलटी मार्ग पोलिस स्टेशनला मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शहरातील भुलेश्वर मार्केट, काळबादेवी येथून 12 जणांना संशयावरून ताब्यात घेतले.

यानंतर संशयितांना प्रथम मुंबादेवी पोलिस चौकीत चौकशीसाठी नेण्यात आले, त्यानंतर नोडल ऑफिसर सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 186-मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील फ्लाइंग स्क्वॉड टीम (एफएसटी) यांना तातडीने माहिती देण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पथकाने तत्काळ छायाचित्रकारांसह कारवाईचे रेकॉर्डिंग करण्यासाठी घटनास्थळ गाठले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आणि ताब्यात घेतलेल्यांचा शोध सुरू केला. या काळात पोलिसांना त्याच्या बॅगेतून 2 कोटी 30 लाखांहून अधिक रुपये सापडले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील भुलेश्वरमध्येही असचं मोठं घबाड सापडलं होतं. मुंबईच्या भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं. ही रक्कम नेमकी कोणाची आहे. याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly election 2024Maharashtra newsmaharashtra policePalghar crime newsPalghar newsक्राइम बातम्यापालघर क्राइम बातम्यापालघर तीन कोटींची रक्कम जप्तपालघर पोलिस
Comments (0)
Add Comment