फडणवीस मराठवाड्यात, आरक्षण आंदोलनातील बड्या नेत्याची अचानक भेट; चर्चेनंतर निघताना सूचक संकेत

Devendra Fadnavis: मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेते विनोद पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेते विनोद पाटील यांच्या भेटीला पोहोचले. फडणवीसांनी अचानक पाटील यांचं घर गाठलं. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. मराठवाड्यातील सध्याची परिस्थिती पाहता फडणवीस आणि पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद पाटील यांची भेट चर्चेत असली, तरीही या भेटीमागचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. विनोद पाटील लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढायची होती, अशी चर्चा होती. छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीत भाजप लढवेल, अशी घोषणा गृहमंत्री अमित शहांनी केली होती. पण युतीत ही जागा कायम शिवसेनेनं लढवली असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदारसंघ भाजपला सोडण्यास नकार दिला. त्यांनी मंत्री संदीपान भुमरेंना तिकीट देत संभाजीनगरची जागा निवडून आणली. त्यामुळे विनोद पाटील यांचं खासदारकीचं स्वप्न अधुरं राहिलं.
ट्रेनचं कपलिंग उघडताना अनर्थ; रेल्वे कर्मचाऱ्याचा हृदयद्रावक अंत; कुटुंबाचा गंभीर आरोप
विनोद पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली, त्याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. ही भेट राजकीय नव्हती, तर कौटुंबिक होती, असं घरातून निघतेवेळी फडणवीस यांनी सांगितलं. पाटील यांना विधान परिषद देणार का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. राजकारणात एक निवडणूक कोणाचं भवितव्य ठरवत नाही. विनोद पाटील यांच्यात नेतृत्त्वगुण आहेत. त्यांनी सातत्यानं सामाजिक भूमिका घेतलेली आहे. ते जेव्हा पूर्णपणे राजकीय भूमिका घेतील तेव्हा कदाचित वेगळा विषय आपल्याला पाहायला मिळेल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं.
Maharashtra Election: ५० हजार बैठका, ६५ संघटना; भाजपच्या मदतीस ‘अदृश्य शक्ती’; महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती?
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपची अक्षरश: धूळधाण उडाली. राज्याच्या सर्वच भागांमध्ये ४५ टक्क्यांहून अधिक मतं घेणाऱ्या भाजपला मराठवाड्यानं धक्का दिला. मराठवाड्यातील एकूण मतदानापैकी केवळ २९ टक्के मतदान भाजपला झालं. २०१९ मध्ये मराठवाड्यात भाजपनं ४ जागा जिंकल्या होत्या. पण यंदा भाजपला इथे भोपळाही फोडता आला नाही. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या दिग्गजांना मराठवाड्यात पराभव पाहावा लागला.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Devendra FadnavisMaharashtra politicsvinod patilदेवेंद्र फडणवीसभाजपमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षणमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकविनोद पाटील
Comments (0)
Add Comment