पोलिस ठाण्याच्या हद्दीत मर्डर, कचरा डेपोत आढळला मृतदेह; खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं

Nashik Murder News: फॉरेन्सिक पथकाचा पंचनामा सुरू आहे. योगेश बत्तासे (रा. नांदगाव) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

हायलाइट्स:

  • पोलिस ठाण्याच्या हद्दीत मर्डर
  • कचरा डेपोत आढळला मृतदेह
  • खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नाशिक क्राइम बातम्या

नाशिक : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौळाणेजवळ असलेल्या कचरा डेपो समोरील जागेत ३० वर्षाच्या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे पथक दाखल झाले आहे. फॉरेन्सिक पथकाचा पंचनामा सुरू आहे. योगेश बत्तासे (रा. नांदगाव) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

जीवघेणा ठरला नायलॉन मांजा!

वडाळा गाव परिसरातील माळी गल्ली येथे पतंग उडविताना नायलॉन मांजामुळे मांडीला गंभीर दुखापत होत झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे नऊ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विष्णू संगम जोशी असे मृत मुलाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ८) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Sada Sarvankar : उमेदवारी मागे घेण्याचा प्रचंड मोठा दबाव, सरवणकरांनी पहिल्यांदाच माघार न घेण्याचं कारण सांगितलं

शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास माळी गल्लीत काही मुलगे पतंग उडवत होते. त्यावेळी विष्णू तिथे पाहण्यासाठी गेला असताना नायलॉन मांजा त्याच्या मांडीत अडकला. गुडघ्या मागे गंभीर जखमी झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्याचा मावसभाऊ गणेश भदरगे याने त्याला डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान विष्णूचा मृत्यू झाला. गंभीर स्वरुपाच्या जखमेमुळे अतिरक्तस्त्राव होत विष्णूचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विष्णूची आई मजुरी करते. त्याला लहान भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली.

गतवर्षी नायलॉन मांजा विक्री व वापरणाऱ्यांना पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली होती. काही विक्रेत्यांना तडीपारदेखील करण्यात आले. मात्र, आता पुन्हा नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू झाला आहे. पंचवटी, वडाळागाव, सिडको, सातपूर, उपनगरमध्ये तरुणांसह लहान मुलांच्या हातात नायलॉन मांजा असल्याचे दिसते.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

nashik breaking newsnashik crime newsnashik indiranagar garbage depot murdernashik indiranagar youth murderNashik Policeनाशिक इंदिरानगर गौळाणे कचरा डेपो हत्यानाशिक इंदिरानगर तरुण हत्यानाशिक क्राइम बातम्यानाशिक पोलिसनाशिक ब्रेकिंग बातम्या
Comments (0)
Add Comment