मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? वाचा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block: ब्लॉकदरम्यान रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
megablock12

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवारी माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने माहीम ते गोरेगावदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकदरम्यान रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

▶ मध्य रेल्वे
स्थानक- माटुंगा ते मुलुंड मार्ग अप आणि डाउन जलद वेळ – सकाळी ११.३० ते दुपारी ३.०५ परिणाम ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यांमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

▶ हार्बर रेल्वे
स्थानक- सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे मार्ग अप आणि डाउन वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० परिणाम – सीएसएमटी ते वाशी / नेरूळ/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल कुलां दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. बेलापूर-खारकोपर-उरण मार्गावरील लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
आमच्या योजना बंद होणार नाहीत; Ladki Bahin Yojanaवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान
▶ पश्चिम रेल्वे
स्थानक- माहीम ते गोरेगाव हार्बर मार्गावरील मार्ग अप आणि डाउन धीमा वेळ – सकाळी ११.०० ते दुपारी ४,०० परिणाम – ब्लॉक वेळेत चर्चगेट ते गोरेगाव, सीएसएमटी-वांद्रे, सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान मार्गावरील अप आणि धीम्या लोकल रद्द राहणार आहेत. ब्लॉकमुळे काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

central railway megablockharbour line blockmumbai local mega blockmumbai local train mega block timetableMumbai Mega Block Updatemumbai news today marathiwestern railwayमुंबई बातम्यामुंबई लोकल अपडेट
Comments (0)
Add Comment