Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. पवित्र भगवा मावळ्याच्या हातात शोभतो, तो दरोडेखोरांच्या नाही. चाळीस जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा घालून आपला पक्षच लुटून नेला. या गद्दारांना आता गाडायचे आहे, असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बुलढाणा येथे केले. आपले सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर बांधणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर, सुरतेलाही महाराजांचे मंदिर उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
३. ‘महाराष्ट्रात कुणाला तरी माझे काम आवडत नसेल, त्यामुळे माझे खासदारकीचे तिकीट कापण्यात आले,’ असे म्हणत भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी उमेदवारी नाकारल्याबद्दलर शुक्रवारी प्रथमच मौन सोडले. प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठे षड्यंत्र असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.
४. नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमच्या सरकारने ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. आज शेतकरी संकटात सापडला आहे. कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. बी-बियाणे, खते, औषधीच्या किमती वाढल्याने खर्च आणि नफ्याचा ताळमेळ बसत नाही. तरीही मोदी-शहांच्या राज्यात शेतकऱ्यांसाठी काय केले जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
५. विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती किंवा महाविकास आघाडी यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मात्र २०१९ च्या निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंचावरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली होती, तसाच काहीसा प्रकार यंदाही घडला आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचे संकेत दिले आहेत.
६. स्वातंत्र्यवीर सावरकर, जम्मू-काश्मीरमधून हटवलेल्या ३७० कलमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लक्ष्य करीत, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात ओबीसी एकजुटीचा नारा शुक्रवारी नाशिक व धुळे येथील सभांतून दिला. सत्तेसाठी ओबीसींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र काँग्रेसने आखल्याचा आरोप मोदी यांनी केला.
७. माझा मुलाचे जाण्याचे हे वय नव्हते. मला वाटतंय त्याचा घातपात झाला असावा. त्याला रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं, ते आम्हाला माहीतच नव्हतं. खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मनात काय आहे, कळायला मार्ग नाही. माझा आणि माझ्या मोठ्या मुलाचा ती विरोध करत आहे, हे शब्द आहेत दिवंगत बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई धानोरकर यांचे. त्यांच्या या आरोपाने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बातमी वाचा सविस्तर…
८. न्यूझीलंडविरुद्ध भारत 0-3 अशा पराभवानंतर बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये आहे. या बैठकीत कर्णधार रोहित शर्मा, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्यासह बोर्डाचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी उपस्थित होते. प्रशिक्षक गंभीर ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते.
९. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि त्यानंतर ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅटट्रिकनंतर आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘नाच गं घुमा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. आता लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
१०. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात बाजारातील व्यवहार एक दिवस बंद राहणार होते तर आता आणखी एक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुधवार, २० नोव्हेंबर रोजी शेअर मार्केटमध्ये सुट्टी असेल आणि कोणतेही कामकाज होणार नाही. या दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे त्यामुळे, बाजारात खरेदी-विक्री बंद ठेवण्यात येईल.