Box Office Collection: कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांचा ‘भूल भुलैया ३’ आता अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ भारीवर पडू लागला आहे. नवव्या दिवशी या सिनेमांनी किती कमाई केली जाणून घेऊ.
भूल भुलैया ३ मध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, संजय मिश्रा आणि राजपाल यादव अशी स्टारकास्ट आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३५.५ कोटींची कमाई केली होती, तर ‘सिंघम अगेन’ने ४३.५ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ बॉक्स ऑफिसच्या बाजी मारेल, असा अंदाज बांधला जात होता, मात्र आता याउलट होताना दिसत आहे. अक्षय कुमार, अजय देवगण, करीना कपूर खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेला ‘सिंघम अगेन’ आता मागे पडला आहे.
‘भूल भुलैया ३’ ने ९व्या दिवशी किती कमाई केली
Sacnilk च्या अहवालानुसार, ‘भूल भुलैया ३’ ची कमाई ८ व्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या शनिवारी म्हणजेच ९व्या दिवशी ६२.१६% वाढली. या सिनेमाने १५.५० कोटी रुपये कमावले. त्यामुळे आता चित्रपटाचे एकूण ९ दिवसांचे कलेक्शन १८३ कोटी रुपये झाले आहे. एकूण कमाईच्या बाबतीत, ‘भूल भुलैया ३’ अजूनही ‘सिंघम ३’ च्या मागे आहे. कारण सिंघम अगेनने ९ दिवसांत १९२.५ कोटींची कमाई केली आहे. ‘भूल भुलैया ३’चे बजेट १५० कोटी रुपये आहे, पण ते अवघ्या ९ दिवसांत या सिनेमाने आपले बजेट वसुल केले आहे. ९व्या दिवशी भुल भलैयाने ‘सिंघम अगेन’ पेक्षा ४ कोटी रुपये अधिक कमावले.
९व्या दिवशी हिंदीतील ‘भूल भुलैया ३’ ला ३५.९८% प्रेक्षक वर्ग होता. संध्याकाळ आणि रात्रीच्या शोमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली. संध्याकाळच्या शोमध्ये ४०.९१% गर्दी होती, तर रात्रीच्या शोमध्ये ती वाढून ५०.६२% झाली. यामुळेच ‘भूल भुलैया ३’ कलेक्शन कमी होऊनही फायदेशीर आहे.