Ladki Bahin Yojana: भाजपने आपला जाहीरनामा घोषित केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना १५०० नाही तर आता २१०० रुपये दिले जातील अशी घोषणा केली आहे.
हायलाइट्स:
अमित शाहांचा उपस्थितीत भाजपचा जाहीरनाम्याची घोषणा
भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणांचा पाऊस
लाडक्या बहिणींना आता १५०० नाही तर २१०० रुपये देणार
भाजपच्या संकल्पपत्रात काय-काय?
- लाडक्या बहिणींना पुढील काळात १५०० ऐवजी २१०० रुपये देणार
- शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांना मोफत वीज दिलेली आहे
- भावांतर योजना आणणार, म्हणजे हमीभावापेक्षा जर कमी भावात मार्केटमध्ये खरेदी सुरु झाली तर हमीभावाने खरेदी तर करुच, पण ज्या ठिकाणी हमीभावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला फरक असेल तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येईल असा निर्णय घेतला आहे, हे गेल्या वर्षीही केलं होतं
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले तेव्हा लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेअंतर्गत पैसे देऊ, आचारसंहिता संपल्यानंतर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिले
- प्रत्येक गरिबाला अन्न -निवाऱ्याचा हक्क देण्याचा निर्णय
- वृद्ध पेन्शन योजनेअंतर्गत जे १५०० रुपये देतो ते वाढवून २१०० रुपये करणार
- जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार
- येत्या काळाात राज्यात २५ लाख रोजगाराची निर्मिती करण्याचं लक्ष्य
- १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून नोकऱ्या देणार