घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी; नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

Nashik Prasad Sanap: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये मनसेच्या एका उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल झाली आहे.

हायलाइट्स:

  • घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी
  • नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
  • ऐन निवडणुकीत मनसेची डोकेदुखी वाढली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मनसे उमेदवार प्रसाद सानप गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक पूर्वचे मनसेचे अधिकृत उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिक पूर्वचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून चोरी केल्याचा आरोप प्रसाद सानप यांच्यावर योगेश पाटील यांनी केला आहे. तर निवडणूक खर्चाची रक्कम योगेश पाटील यांनी वापरली नाही, असा आरोप प्रसाद सानप यांनी केलाय. हेच पैसे परत मागण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रसाद सानप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगेश पाटील यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातून तब्बल ८ लाख ८४ हजार रुपये रोख चोरल्याचा आरोप केला गेला आहे. एकूण ९ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची तक्रार योगेश पाटील यांनी केली आहे. याच तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी प्रसाद सानप यांच्यासह त्यांच्या जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

mns candidate prasad sanapmns candidate prasad sanap case filednashik crime newsnashik prasad sanap newsनाशिक क्राइम बातम्यानाशिक प्रसाद सानप बातम्यामनसे उमेदवार प्रसाद सानप गुन्हा दाखल
Comments (0)
Add Comment