Nanded North Vidhan Sabha Candidates: विधानसभा निवडणूकीचा प्रचाराचा धुरळा उडाला असताना आता नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारावरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. जागावाटपाच्या वाटाघाटीत ही जागा काँग्रेसला सुटली असताना
या स्थितीमुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते विभागले गेले असल्याचे चित्र मतदारसंघात निर्माण झाले आहे. नांदेड उत्तरची जागा काँग्रेसला सुटल्याने अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे संगीता पाटील डक यांनीही ठाकरे गटाकडून आपला स्वतंत्र प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. त्यातच काल नांदेड दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी काँग्रेसचे अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण उद्धव ठाकरेंनीच खुद्द आज उमेदवार घोषित केल्यामुळे मतदारसंघात मविआमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज परभणी दौरा आटोपून नांदेड येथील सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि नांदेड उत्तरचा उमेदवार शिवसेनेच्या संगीता पाटील डक असल्याची घोषणा केली. नांदेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करण्याची संधी आली आहे, याचं सोनं करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ज्या मतदारसंघात गद्दार उभे आहेत, त्यांना पाडा आणि आपल्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन देखील ठाकरे यांनी केले. यामुळे मतदार देखील संभ्रमात पडणार, हे निश्चित.