राज्यातील भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने सांगितला निवडणुकीचा निकाल; अजित पवारांना फक्त २५ जागा, मविआमध्ये ठाकरे गटाचा स्ट्राइक रेट सर्वात…

Maharashtra Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला १५५ ते १६० जागा मिळतील असा अंदाज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. अशाच भाजपच्या एका मोठ्या नेत्याने दिलेली मुलाखत चर्चेतआली आहे. या मुलाखतीत आगामी निधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपचे नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठा अंदाज व्यक्त केला आहे.

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत अनेक पैलूंवर मते व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत कसे चित्र आहे यावर बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा फक्त .०३ टक्के जास्त मिळाली. प्रत्येक निवडणुकीत एक थर्ड फ्रंट असतो त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत होत नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत होत असतो. या तिसऱ्या आघाडीत असलेले पक्ष ५ ते १० हजार मते घेतात किंवा काही ठिकाणी विजयी देखील होतात. जर आजची परिस्थिती लोकसभेसारखीच आहे असे ग्रृहीत धरले तर जो फायदा लोकसभेत मविआला झाला तसा फायदा महायुतीला होईल. या विभाजनाचा फायदा महायुतीला होईल असे सांगताना तावडे म्हणाले की, पण आता परिस्थिती बरीच बदललेही आहे. लाडकी बहिण योजनेमुळे गोष्टी फार बदलल्या आहेत.

राज्यातील निवडणुकीच्या निकालाबाबद अंदाज व्यक्त करताना तावडे यांनी महायुतीला स्पष्टबहुमत मिळेल असे सांगितले. राज्यात महायुतीला १५५ ते १६० जागा मिळतील. त्यापैकी भाजपला सर्वाधिक ९० ते १०० जागा असतील. तर शिवसेना शिंदे गटाला ४० आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला २० ते २५ जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर उर्वरित जागा मविआला असतील. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा स्ट्राइक रेट सर्वाधिक असेल त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार आणि मग उद्धव ठाकरे गटाचा नंबर लागेल, असा अंदाज ताडवे यांनी व्यक्त केला.
रशियाचे धाबे दणाणले! युक्रेनने थेट राजधानी मॉस्कोवर केला हल्ला; ३ विमानतळ बंद ठेवण्याची वेळ आली
लोकांशी कनेक्ट होताना अडचणी

विधानसभा निवडणुकीत सध्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना लोकांशी कनेक्ट होताना अडचणी येत असल्याचे तावडे यांनी सांगितले. अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे लोकांशी रोजचा संपर्क असलेला नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य नसल्याने ही अडचण झाल्याचे त्यांनी सांगितले.

नवाब मलिक

जागा वाटपावेळी आम्ही कोणत्या जागा लढायच्या कोणत्या नाहीत यावर जसे बोलतो तसेच या व्यक्तीला तिकीट देऊ नये अशी देखील चर्चा करतो. पण त्या एका जागेसाठी युती तोडने शक्य नाही. मलिकांना तिकिटी देऊ नये असे आम्ही सांगितले होते. पण त्यांनी दिले. त्यामुळे आम्ही प्रचाराला जाणार नाही आणि ते आमचा झेंडा देखील वापरत नाहीत, असे नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर तावडेंनी भूमिका स्पष्ट केले.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

vinod tawde latest newsvinod tawde predicted Maharashtra Election 2024महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटविनोद तावडे मुलाखत
Comments (0)
Add Comment