चांदीच्या विटानंतर आता एक कोटी सापडले; कल्याणमधील गांधारी परिसरातील कारवाई

Maharashtra Election 2024: निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला कल्याणच्या गांधारी परिसरात एका व्हॅनमधून १ कोटीहून अधिक रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कल्याण: राज्यातील विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणा दिवस रात्र काम करत आहे. राज्यात निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. रविवारी कल्याणमधील गांधारी परिसरात तपासणी पथकाला एका व्हॅनमधून तब्बल १ कोटी २० लाख इतकी मोठी रक्कम मिळाली आहे.

कल्याणच्या गांधारी परिसरात निवडणूक भरारी पथकाने वाहन तपासणी दरम्यान एटीएमच्या व्हॅनमध्ये एक कोटी रुपयांची रोकड ताब्यात घेतले असून एकूण रक्कम एक कोटी वीस लाख असल्याचे समजते. व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना या रक्कमेबद्दल विचारणा केली असताना त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी व्हॅन ताब्यात घेतली आहे. तसेच चौकशी सुरू केली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे समजते.

विशेष म्हणजे रविवारीच मुंबईतील विक्रोळीत एका व्हॅनमध्ये ६ हजार ५०० किलोच्या चांदीच्या विटा साडपल्यानंतर कल्याणमध्ये १ कोटींहून अधिक रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Kalyan newsmaharashtra election 2024कल्याण ताज्या बातम्याकल्याणमध्ये १ कोटी जप्तविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment