Sunil Tingre Notice To Sharad Pawar: सुप्रिया सुळे यांनी दावा केला होता की सुनिल टिंगरे यांनी शरद पवारांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. सुनिल टिंगरे यांनी हा दावा फेटाळून लावला होता. मात्र, आता ही नोटीस पुढे आली आहे.
सुप्रिया सुळे यांनी बापू पठारे यांच्यासाठी घेतलेल्या सभेमध्ये सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ‘पोर्शे कार दुर्घटनेत ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत. इथल्या स्थानिक नेत्यांनी पोर्शे कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे. ज्यांनी पोर्शे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत केली त्याच नेत्यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे की, तुम्ही या दुर्घटनेच्या केसमध्ये माझी बदनामी केली, तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. मी त्या नेत्याला आव्हान देते की, मी एकदा नाही तर शंभर वेळा ज्यांनी त्या दोन युवकांची हत्या केली, त्यांची मदत करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात बोलणार. तुमच्यात हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना देखील नोटीस पाठवाच, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी टिंगरे यांना केले होते
त्यानंतर, मी वैयक्तिक साहेबांना कोणती नोटीस दिली नाही, असं स्पष्टीकरण सुनील टिंगरे यांनी दिले होते. ‘काल वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी मी शरद पवार यांना नोटीस पाठवली अशी माहिती देण्यात आली. यावर मी स्पष्ट करु इच्छितो की माझ्याकडून साहेबांना कोणतीही नोटीस बाजवण्यात आलेली नाही. मध्यंतरी एका प्रकरणात अनेक पार्टीचे नेते लीडर आणि प्रवक्त्यांनी माझ्यावर अनेक वक्तव्य केले त्यातून माझी बातमी करण्यात आली, लोकांमध्ये गैरसमज तयार करण्यात आले.
Sharad Pawar: शरद पवारांचं नाव, सुनिल टिंगरेंची सही; सुप्रिया सुळेंनी उल्लेख केलेली ती नोटीस समोर
आता विधानसभा निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने चुकीचा प्रचार होऊ नये या हेतूने मी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना नोटीस देऊ आपण शहानिशा न करता चुकीच्या माहितीच्या आधारे माझ्यावर कुठल्याही वक्तव्य करू नये अशा पद्धतीची नोटीस मी त्यांना दिली आहे. वैयक्तिक साहेबांना कोणतीही नोटीस दिली नाही. सुनील टिंगरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता प्रत्यक्षात नोटीसच समोर आल्यामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात नवा वाद निर्माण झाला आहे.