लाडक्या बहिणींना भरभरुन रक्कम ते शेतकरी कर्जमाफी, BJPच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

BJP Manifesto 2024: शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहिण योजनेत २१०० रुपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी भावांतर योजना, अशा बऱ्याच प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

हायलाइट्स:

  • लाडक्या बहिणींना भरभरुन रक्कम ते शेतकरी कर्जमाफी
  • BJPच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस
  • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भाजपाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा

मुंबई : मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असं नाव दिलं आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहिण योजनेत २१०० रुपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी भावांतर योजना, अशा बऱ्याच प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा जणू पाऊस पडला आहे. जाणून घ्या भाजप ५ वर्षांत काय करणार? भाजपच्या संकल्पपत्रात कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे दिले आहेत.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे १३ मुद्दे

१. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार

२. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार

३. शेतकऱ्यांची कर्जमाफी भावांतर योजना आणणार

४. वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजारावरुन आता २१०० रुपये करणार

५. व्हीजन महाराष्ट्र @२०२९ प्रसिद्ध करणार

६. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय

७. २०२७ पर्यंत ५० लाख लखपती करण्याचा निर्णय

८. राज्यात कौशल्य जनगणना करणार

९. महारथीमार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार

१०. नव्या उद्योजकांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार

११. स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड बनवून युवा आरोग्यावर लक्ष ठेवू

१२. महाराष्ट्राला एआय आणि फिटनेस हब बनवू

१३. छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र निर्माण करुन उद्योजकांना संधी देऊ

दरम्यान, भाजपाच्या या जाहीरनाम्यावेळी भाजपचे नेते अमित शाह तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वाखालील १८ विभागप्रमुखांच्या समितीने भाजपचे हे संकल्पपत्र तयार केले आहे. ”जो संकल्प करतोय, तो महाराष्ट्रच्या प्रगतीचा विकासाचा आणि छत्रपतींच्या रयतेचा आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगाने वाढ होत आहे. राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढत आहे. महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न सहा हजार रुपयांनी कमी झाले होते”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

amit shahBJP manifesto 2024manifestoVidhan Sabha ElectionVidhan Sabha Election 2024अमित शाहभाजपाभाजपा विधानसभा निवडणूक जाहीरनामाभाजपाचा जाहीरनामाभाजपाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा
Comments (0)
Add Comment