पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने घरात एकट्या मुलीला पाहिल्यावर पार्सल आल्याचं खोटं सांगत घरामध्ये गेला. त्यानंतर मुलीने आरडा-ओरडा सुरू केला. वाघोली परिसरामध्ये ही घटना घडली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पीडित मुलगी कुटुंबीयांसह वाघोली परिसरात राहते, तिची आई बाहेर घरकाम करण्यासाठी जाते. त्यामुळे पीडित मुलगी त्यावेळी घरामध्ये एकटीच होती. त्यावेळी डिलिव्हरी बॉयने तिला घरात एकटी असल्याचा अंदाज घेतला. डिलिव्हरी बॉय घराबाहेर आला. ‘तुमच्या आईच्या नावे पार्सल आले आहे, असे त्याने सांगितले, घरात शिरून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित मुलगी मोठ्याने ओरडू लागली आणि रडू लागली. तेव्हा आजूबाजूचे लोक जमण्याच्या भीतीने डिलिव्हरी बॉय तिथून पळून गेला.
मुलीने आरडाओरडा केल्यावर तिला धमकावून डिलिव्हरी बॉयने फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलीच्या आईने वाघोली (लोणीकंद) पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, संबंधित डिलिव्हरी बॉयविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यासह (पोक्सो) भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात एकट्या असलेल्या मुलीशी डिलिव्हरी बॉयने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक विनायक अहिरे करीत आहेत. आता घरात असलेल्या मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत हे यावरून दिसून येतं. घराबाहेर असल्यावर मुलींन असुरक्षित असल्याचं वाटतं पण आता जर घरातही असा प्रकार घडत असेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.