एरंडोल:(शैलेश चौधरी) येथील रहीवासी व सध्या नाशिक येथे पँथॉलॉजिकल लँबोरेटरी चालक असलेले लोक क्रांती युवा सेनेचे विभागीय अध्यक्ष उमेश महाजन हे नेहमी सातत्याने गरजू रुग्णांना त्यांनी स्थापन केलेल्या जय बाबाजी फाऊंडेशन च्या माध्यमातून मदत करत असतात.
काही दिवसांपुर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पातुरडा येथील निर्मला बाई मधुकर गिरे यांना कॅन्सरचा आजार उद्भवला.त्यावरील उपचारासाठी तेथील डॉक्टरांनी त्यांना साधारण दोन ते अडीच लाख रुपये खर्च सांगितला होता परंतु त्यांची तेवढी परिस्थिती नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या कुटुंबा समोर मोठे संकट निर्माण झाले होते.
अश्या वेळेस निर्मला गिरे यांनी एरंडोल येथील त्यांच्या जावयाच्या माध्यमातून जय बाबाजी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व लोक क्रांती युवा सेनेचे विभागीय अध्यक्ष उमेश अभिमन महाजन यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी शासकीय योजनेच्या माध्यमातून व आपल्या फाऊंडेशन च्या मदतीने निर्मला बाई गिरे यांचे सर्व उपचार मोफत घडवून आणले. त्या वेळी दुःखात सापडलेल्या गिरे कुटुंबियांच्या चेहर्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले व त्यांनी लोक क्रांती युवा सेनेचे विभागीय अध्यक्ष उमेश महाजन यांचे आभार मानले. त्यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.
समाजात अनेक स्वयंघोषित व फक्त पैसेखाऊच नव्हेत तर मृताच्या पार्थिवाचा देखिल सौदा करणारे आरोग्यदूत वावरत आहेत. उमेश महाजन यांचे कार्य अश्या कथित आरोग्यदूतांसाठी साठी फार मोठी शिकवण आहे.