Maharashtra Assembly Election 2024 : दिल्लीतील नेत्यांकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी महिला नेत्याला संधी देण्याचा विचार सुरू आहे.
नागपुरात संविधान सन्मान महिलेला सधी देऊन काँग्रेसची प्रतिमा उंचावण्यासाठी ‘हायकमांड’चा प्रयत्न संमेलनाच्या निमित्ताने राहुल गांधी आले असता ‘महिलाओं के सन्मान मे राहुल गांधी मैदान मे’ असे नारे देण्यात आले होते. पण, काँग्रेसने किती महिलांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली असा सवालही यानिमित्ताने केला गेला. संमेलनाला उपस्थित महिला सदस्यांनीच दबक्या आवाजात हा विषय मांडला. विधानसभा निवडणुकीत ५० टक्के मतदार महिला असतानाही पक्षाकडून अपेक्षित विचार होत नसल्याची खंतही व्यक्त केली. महायुतीकडून लाडकी बहीणच्या माध्यमातून महिलांना जोडण्याचे काम होत असताना काँग्रेसकडे काहीही ‘तोड’ नसल्याचीही खंत व्यक्त झाली. यावर उपाय म्हणून थेट मुख्यमंत्रिपदाचा चेहरा वैदर्भीय महिलेचा देऊन काँग्रेस या उणिवेवर मात करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्याही नावावर विचार होत असल्याची माहिती आहे. अॅड. यशोमती ठाकूर या विदर्भाचे प्रतिनिधित्व करतात. अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन टर्म निवडून आल्या. ठाकरे सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. यापूर्वी त्यांचे वडीलही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांचा वारसा अॅड. यशोमती ठाकूर चालवित आहेत.
राज्यात सर्वाधिक ६२ जागा या प्रदेशात आहेत. शिवाय पटोले यांना डावलल्यास विदर्भात असंतोष उफाळून येऊ शकतो. या प्रदेशावर अन्याय केल्याची भावनाही वाढीस लागू शकते. त्यामुळे याच प्रदेशातील महिलाला संधी देण्याचा विचार मांडण्यात आला. यातूनच अॅड. ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.