Maharashtra Election : आशिष शेलार यांनी घरातील वातावरणाबाबत सांगताना पत्नीला क्रेडिट दिले. घरात शक्यतो आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही, असं आशिष शेलार म्हणाले.
काय म्हणाले आशिष शेलार?
“माझे सासरे सीताराम दळवी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार होते. उबाठाचे नाही. दुर्दैवाने गेल्या महिन्यात त्यांचं निधन झालं. माझी पत्नी राजकारणात नाही. त्यामुळे वडिलांसोबत ती मुलगी म्हणून असायची, भावाबरोबर ती बहीण असते, माझ्यासोबत ती पत्नी असते आणि मुलासोबत आई असते, माझा मुलगा कुठल्याच राजकीय पक्षात नाही” असं आशिष शेलार सांगत होते.
पत्नीला श्रेय
“या सगळ्याचं क्रेडिट मी माझ्या पत्नीला देतो, कारण माझी तर कुठलीच अडचण होत नाही, पण अडचण तिची होऊ शकते. मात्र प्रतिमाने घर म्हणून सर्व नात्यांना सांभाळलं. घरात शक्यतो आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही” असं आशिष शेलार म्हणाले.
शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं पाच ऑक्टोबर रोजी निधन झालं. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. मनसे नेते संदीप दळवी यांचे वडील, तर भाजप नेते आशिष शेलार यांचे ते सासरे होत.
Ashish Shelar : सासरे शिवसेनेत होते, मेहुणा मनसेत, तुम्ही भाजपात; शेलार म्हणतात, माझा मुलगा मात्र…
नगरसेवक ते आमदार
सीताराम दळवी हे अंधेरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली शिवसेनेच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले होते. त्याआधी त्यांनी मुंबई महापालिकेत नगसेवक पद भूषवलं होतं. अनेक वर्ष ते शिवसेनेत कार्यरत होते.
बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. शिवेसेनेच्या उमेदीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोस हे त्यांचं मूळ गाव, मात्र मुंबईतील अंधेरीत त्यांचं अखेरपर्यंत वास्तव्य होतं.