भाजपसाठी संघाची ‘स्पेशल ६५’ कामाला; विधानसभेला शांतीत क्रांती करण्याचा प्लान, योजना काय?

Maharashtra Election: हरियाणात संघ सक्रिय झाल्यानं भाजपनं हातातून निसटलेली विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर आता संघ महाराष्ट्रात प्रचंड सक्रिय झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: लोकसभा निवडणूक सुरु असताना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेलं विधान चांगलंच गाजलं. पूर्वी भाजप कमकुवत होता. तेव्हा आम्हाला संघाची गरज भासायची. आता आम्ही आत्मनिर्भर आहोत, असं नड्डा म्हणाले. यानंतर संघानं भाजपच्या प्रचारातून अंग काढलं. त्याचा फटका भाजपला बसला. भाजपच्या जागा कमी झाल्या. बहुमतापासून पक्ष दूर राहिला. त्यानंतर हरियाणात संघ सक्रिय राहिला. भाजपनं हातातून निसटलेली निवडणूक जिंकली. त्यानंतर आता संघ महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे.

संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली आहे. नागपुरात संघाचं मुख्यालय आहे. पुढल्या वर्षी संघाला १०० वर्ष पूर्ण होतील. संघ शंभरी गाठत असताना, मुख्यालय असलेल्या महाराष्ट्रातच भाजपची सत्ता नसल्यास, ती संघासाठी नामुष्की असेल. त्यामुळेच संघानं महाराष्ट्रात स्पेशल ६५ प्रचार सुरु केला आहे. संघाशी संबंधित ६५ संघटनांनी सजग रहो मोहीम हाती घेतली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या महायुतीसमोर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं आव्हान आहे.
Eknath Shinde: CM शिंदे भडकले, व्यासपीठावरच सहकाऱ्यांवर चिडले; संताप कॅमेऱ्यात कैद, नेमकं काय घडलं?
संघाच्या सजग रहोचा थेट संबंध भाजप नेत्यांकडून वापरण्यात येणाऱ्या बटेंगे तो कटेंगेशी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बटेंगे तो कटेंगेची घोषणा सर्वप्रथम दिली. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन, त्याविरोधात ओबीसींची आक्रमक भूमिका, धनगर आरक्षण याचा फटका महायुतीला विधानसभेला बसू शकतो. त्यामुळेच भाजपनं बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला आहे.

लोकसभेला मराठा आंदोलनाचा फटका भाजपसह महायुतीला बसला. त्याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देत हिंदू मतांचं जातींमध्ये विभाजन टाळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. संघाचे स्वयंसेवक आणि ६५ संघटना सध्या हाच संदेश देण्यासाठी शेकडो बैठका घेत आहेत.
Kirit Somaiya: वोट जिहादसाठी हवालाचे १२५ कोटी रुपये वापरले; सोमय्यांचा गंभीर आरोप; थेट मतदारसंघच सांगितला
संघाशी संबंधित ६५ संघटना सध्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय आहेत. अतिशय शांतपणे त्यांची कामं सुरु आहेत. चाणक्य प्रतिष्ठान, मातंग साहित्य परिषद, रणरागिणी सेवाभावी संस्था सध्या प्रचाराचं काम करत आहेत. संघाचे चार प्रांत, कोकण, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. शाखा स्तरावर त्यांचं काम सुरु आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpharyana electionMaharashtra politicsRSSदेवेंद्र फडणवीसभाजपभाजप आरएसएसमहाराष्ट्र निवडणूकमहाराष्ट्र राजकीय बातम्याराष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Comments (0)
Add Comment