सोलापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण, माजी आमदाराच्या घरावर दगडफेक, दोन संशयित ताब्यात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Nov 2024, 9:43 am

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात माकप उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. सोमवारी रात्री प्रचारादरम्यान हा प्रकार घडला. विरोधकांनी हा हल्ला केल्याचा आरोप आडम यांनी केला असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
former mla narsayya adam

सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात चौरंगी निवडणूक लढत सुरू आहे. माजी आमदार आणि माकप नेते नरसय्या आडम, काँग्रेसचे चेतन नरोटे, भाजपचे देवेंद्र कोठे आणि एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांच्यात मुख्य लढत सुरू आहे. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माकपचे उमेदवार नरसय्या आडम हे प्रचाराला गेले असता, अज्ञात समाज कंटकाकडून गोंधळ करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांनी कटकारस्थान केले आहे. मी नसताना माझ्या राहत्या घरासमोर येऊन गोंधळ केला, माझ्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली,अन् माझ्या घरावर दगडफेक केल्याची प्रतिक्रिया आडम मास्तर यांनी दिली.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ दिवसेंदिवस संवेदनशील मतदारसंघ होत चालला आहे. माकपचे उमेदवार आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरासमोर अज्ञात लोकांनी केलेल्या गोंधळाची सखोल चौकशी सुरू आहे. बाजार पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून गोंधळ करून दगडफेक करणारे कोणत्या पक्षाचे आहेत का? याबाबतचा तपास सुरू आहे.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात माकपचे उमेदवार आडम मास्तर यांनी व्हिडीओ चित्रफीत प्रसारित केली आहे. भविष्यात माझ्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो. मी सोलापूर शहर पोलीस प्रमुखांना याबाबत लेखी निवेदन देणार आहे. दगडफेक करणाऱ्यावर कडक कारवाई करा अशी मागणी करणार असल्याचं नरसय्या आडम यांनी सांगितलं.

Source link

former mla narsayya adamSolapurStone pelting i solapurvidhansabha nivadukनरसय्या आडम घरावर दगडफेकनरसय्या आडम मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment