Nandurbar Chandrakant Raghuvanshi: नंदुरबार येथील नवापूर विधानसभेत शिंदेंच्या नेत्याने अजित पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आता काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. या मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं वर्चस्व आहे. आता त्यांनी अजितदादांच्या नेत्याला समर्थन दिल्याने इतर उमेदवारांना धडकी भरली आहे.
शिंदे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे काँग्रेसचे उमेदवार आमदार शिरीष नाईक तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार भरत गावित यांच्याशी घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेत रघुवंशी नेमके कुणाला मदत करतात याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून होते.
कारण, जिल्ह्यातील चार विधानसभेत चंद्रकांत रघुवंशी यांची वेगवेगळी भूमिका आहे. दरम्यान रघुवंशी यांचे कार्यकर्ते भरत गावित यांचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते. त्यामुळे भरत गविताना रघुवंशी मदत करतील अशी चर्चा रंगली होती. खांडबारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होती. या सभेत चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थिती लावत जोरदार भाषण केले. त्यामुळे रघुवंशी हे भरत गावित यांना मदत करतील हे जाहीर झाले.
या विधानसभेत काही भाग नंदुरबार तालुक्याचा जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या भागात रघुवंशी यांचे वर्चस्व आहे. भरत गावित यांच्या प्रचारात ते सहभागी झाल्याने काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार नाईक व अपक्ष उमेदवार शरदकुमार गावित यांचे टेन्शन वाढले आहे. असे असताना रघुवंशी शेवटपर्यंत भरत गावित यांना मदत करतात की शेवटच्या दोन-तीन दिवसात निर्णय बदलतात याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
Nandurbar: गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मदत, आता अजितदादांच्या उमेदवाराचा प्रचार, शिंदेंच्या नेत्याने मविआचं टेन्शन वाढवलं
महायुतीच्या मेळाव्यात भाजपा उमेदवारावर टीका
अजित पवार यांच्या उपस्थितीत खांडबारा येथे जाहीर सभा झाली. या सभेत चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ. गावित यांच्यासह परिवारावर टीका केली. तोच धागा पकडत अजित पवार यांनीही डॉ. गावित यांच्यावर टीका केली. तसेच चंद्रकांत रघुवंशी यांनी आम्ही नंदुरबारमध्ये त्यांना फटके देत आहोत तुम्ही ही मदत करा असे वक्तव्य करून एकप्रकारे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेत काँग्रेससाठी मदत मागितल्याची चर्चा आहे.