बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली. पोलिसांनी या प्रकरणी 25 जणांना अटक केली असून, मुख्य शूटर शिवकुमार गौतम उर्फ शिवा याला नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली. आता अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलीये.
शिवा याच्याकडून काही मोठे खुलासे पोलिस चाैकशीत करण्यात आले. शिवा नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक करण्यात आली. मुख्य शूटर शिवकुमार याच्यासह पाच आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींना यूपीमधून ट्रान्झिट रिमांडवर आणण्यात आले आणि त्यांना मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांकडून शिवा आणि त्याच्या चार साथीदारांना बहराईच जिल्हातील नानपारा येथून अटक करण्यात आली. शिवा याला नेपाळमध्ये पळून जाण्यासाठी धर्मराज कश्यप, ज्ञान प्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंह हे मदत करत होते. मुख्य शूटर शिवा हा बहराईच जिल्हातील कैसरगंज पोलिस स्टेशन हद्दीतील गंडारा गावचा रहिवासी आहे. तो काही वर्षांपूर्वी मजुरी करण्यासाठी महाराष्ट्रात आला होता.
बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठे अपडेट, 5 आरोपींना पोलिस कोठडी, मुंबई पोलिसांनी..
शिवाने आपल्याच गावातील धर्मराज कश्यप याला देखील कामासाठी बोलावले होते. शिवाने चाैकशीमध्ये सांगितले की, अनेक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात शुभम लोणकर हा होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या अगोदर मोबाईल, सिम सर्वकाही शुभम लोणकर यानेच दिले होते. सर्व व्यवस्था शुभम लोणकर याच्याकडून करण्यात आली होती. आता या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.