Kinwat Bhimrao Keram Controversy Statement In Nanded : भाजप आमादाराने भर सभेत केलेल्या वक्तव्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत त्यांनी बेताल वक्तव्य केलं आहे.
किनवट मतदारसंघाच्या उमेदवाराची जीभ घसरली
भीमराव केराम हे भाजपकडून किनवट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी किनवट तालुक्यातील बोधडी येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भीमराव केराम हे भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली. अनेकजण म्हणतात केराम साहेब गावात येत नाहीत. गावात येऊन काय मुके घ्यायचे का? मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचे काम मी करतो, असं केराम पुढे म्हणाले. भीमराव केराम यांच हे बेताल वक्तव्य ऐकून व्यासपीठावर असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याने आमदार भीमराव केराम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आमदार भीमराव केराम यांच्यावर जनता नाराज
२०१९ च्या निवडणुकीत भीमराव केराम यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. तीन टर्म आमदार असलेले प्रदीप नाईक यांचा त्यांनी पराभव केला. दरम्यान निवडून आल्यानंतर ते गावाला भेटी देत नाही, अशी ओरड मतदारसंघातील जनतेकडून केली जात आहे. हजारो करोड रुपयांची विकास कामे केल्याचा दावा केला जात आहे. मात्र विकास कामे कुठे आहेत? हजारो करोड रुपये कुठे खर्च झाले? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
Nanded News : रोज रोज गावात येऊन काय मुके घ्यायचे का? पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजप आमदाराचं बेताल वक्तव्य
मुख्यमंत्र्याच्या माजी खाजगी सचिवाची जीभ घसरली
मुखेड मतदार संघातील अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या मुख्यमंत्र्याच्या माजी खाजगी सचिवाचीही जीभ घसरली. एका जाहीर सभेत बालाजी खतगावकर यांनी भाजप उमेदवाराला कुत्र्याची औलाद आहे का? अशी बोचरी टीका केली. आमदार तुषार राठोड यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली. विधी मंडळात निवडून आलेले सदस्य मला बाहेरचा उमेदवार म्हणत आहेत, त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? गुडघ्यात मेंदू आहे का? माणसाची औलाद आहे का कुत्र्याची औलाद आहे? अशी जहरी टीका अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांनी केली.