Maharashtra Assembly Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी नागपूर येथे झालेल्या सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला.
योगी आदित्यनाथ म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होत आहे. एकीकडे महायुती महागठबंधन आहे ज्याचे नेतृत्व जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय नेते नरेंद्र मोदीं करत आहे. तर दुसरीकडे महाआघाडीच्या नावावर “महाअनाडी” आहे. त्यांच्याकडे ना कुठला नेता आहे आणि ना कुठली नीती आहे. महाराष्ट्रात महायुतीची डबल इंजिन सरकार हीच महाराष्ट्राच्या हिताचे आहे आणि देशाच्या हिताचे आहे हे आवाहन करण्यासाठी मी नागपूरला आलो आहे.
यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक योगदानाचे कौतुक करत म्हणाले, “महाराष्ट्र ने देशाला स्वराज्य, समता आणि समानता दिली आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आदर्श दाखविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचा संदेश दिला,” असे नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पुन्हा जुन्या मुद्द्यांवर जोर देत आहे आणि समाजात जातीच्या नावावर फूट पाडायला आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर आरोप केला की, ती महाराष्ट्राला “लव्ह जिहाद” आणि “लँड जिहाद” मध्ये अडकवू इच्छित आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसचे तुष्टीकरण धोरण तुमच्यासाठी पहिले आहे, त्यामुळेच तुम्हाला खरे बोलता येत नाही. “जेव्हा हैद्राबादच्या निझामच्या रझाकार अत्याचार करत होते, हिंदूंना मारत होती. गावोगावी जाळत होता. यावेळी मल्लिकार्जून खरगे यांचे गावही जाळण्यात आले, त्यात त्यांची आई, मावशी आणि बहीण यांचाही मृत्यू झाला. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी आणि हिंदूंसाठी पत्र लिहिले होते ज्या हिंदू आणि दलितांवर तिथे अत्याचार होत आहे त्यांनी महाराष्ट्रात त यावे. पण खरगे यांना हे सत्य बोलायचे नाही, कारण त्यांना वाटते की मी निजामावर आरोप केले तर मुस्लिमांचे मत मिळणार नाही.
हिंदूंच्या गणेशोत्सव, रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक का होते, तेव्हा रझाकार याची हिम्मत कशी झाली, एवढ्या हिंदूंची हत्या कशी झाली होती, 1947 ला लाखो हिंदू का कापले गेले. कारण तेव्हा “बटे थे इसलीये कटे थे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे” मग दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वात बदलत्या भारत त्याला पाहिला असेल, देशाच्या सीमा मोदींनी सुरक्षित केल्या, 2014 च्या आधी पाकिस्तान भारतात येऊन आतंकवादी घटना घडवत होता. मात्र आता हा नवीन भारत आहे हा कोणाला छेडत नाही पण कोणी छेडलं तर त्याला सोडत ही नाही.
योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या विरोधात कायदा करण्याची गरजही व्यक्त केली. “काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे कधीच होणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.शेवटी, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमधील आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला मत द्यावे अशी विनंती केली आणि उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये भाजपाच्या विजयावर आनंद व्यक्त केला.