खाली आणू लाल बावटा आणि फडकवू भगवा… भर सभेत उपमुख्यमंत्र्यांची घोषणा, कोळी बांधवांना वाढवण बंदराबाबत देवा भाऊचा शब्द

Devendra Fadnavis in Palghar Comment on Vadhavan Bandar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये कोळी बांधवांना तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नसल्याचा शब्द देत भर सभेत खाली आणू लाल बावटा आणि फडकवू भगवा अशी घोषणा दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नमित पाटील, पालघर : वाढवण बंदराबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेकांनी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. कुणी म्हणाले वाढवण बंदरामुळे मच्छीमारांचे हक्क जातील, आदिवासींच्या जमिनी जातील, पण कोणालाही उद्ध्वस्त करून विकास करणारे नाही, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन विकास करणारे आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आई भवानीच्या चरणी मागतो जोगवा, खाली आणू लाल बावटा आणि फडकवू भगवा…. डहाणूमध्ये आता लाल बावटा नाही, तर भगवा फडकताना दिसेल, असे म्हणत डहाणूमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव करून भाजप विजय होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. डहाणू येथे भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार विनोद मेढा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
Solapur News : पंतप्रधान मोदींचा मविआवर घणाघात; मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून थेट नुरा कुस्तीशी केली तुलना
वाढवण बंदरामुळे या भागाचे चित्र बदलेल, पण त्याचवेळी मासेमारी करणारे कोळी बांधव त्यांना देवा भाऊचा शब्द आहे. तुमच्यावर कुठला अन्याय होणारच नाही, आहे त्यापेक्षा चांगली अवस्था तुम्हाला आणून देऊ, तुमचा व्यवसाय कसा मोठा होईल, पारंपरीक व्यवसायाला नवीन उंची कशी मिळेल याचा प्लॅन आम्ही तयार केला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये येथील कोळी बांधव समृद्ध झालेले पाहायला मिळतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’चा जयघोष, कोणत्या पक्षाने किती मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिलं? आकडेवारी समोर
९१ आणि २०२४ पर्यंत वस्तुस्थिती, परिस्थिती खूप बदललेली आहे. मात्र ९१ च्या नोटिफिकेशनमुळे डहाणूचा विकास थांबलेला असून यामुळे जीव गुदमरतो, त्यातून डहाणूला मोकळं करायचे आहे. पर्यावरणावादी विषयांबाबत विरोध नाही, पण शहरांच्या गरजा वाढत आहेत. पालघर आणि डहाणूच्या आदिवासींची जमीन आणि जंगल कोणालाही घेऊ देणार नाही. इथले जंगल, नैसर्गिक संपदा, जैवविविधता यावर कुठलाही डाग येऊ देणार नाही. पण सामान्य माणसाचं जीवन कशाप्रकरे सुकर करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. डहाणूचा ५० टक्के विकास झाला, असून उर्वरित ५० टक्के विकास सरकार आल्यावर करू, असे आश्वासन फडणवीसांनी या जाहीर सभेत दिले आहे.
Nanded News : रोज रोज गावात येऊन काय मुके घ्यायचे का? पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजप आमदाराचं बेताल वक्तव्य

खाली आणू लाल बावटा आणि फडकवू भगवा… भर सभेत उपमुख्यमंत्र्यांची घोषणा, कोळी बांधवांना वाढवण बंदराबाबत देवा भाऊचा शब्द

पालघर आणि मुंबईचे रस्ते आणि रेल्वेमुळे कनेक्टिव्हिटी आहे, कोस्टल रोड देखील नरिमन पॉईंट ते विरारपर्यंत करण्यात येत आहे. मात्र एअरपोर्टची कमतरता असल्याने त्याबाबतची मागणी देखील पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. या भागात लवकरच एअरपोर्ट देखील उभारण्यात येणार आहे. पालघर जिल्हा कुपोषणासाठी कुप्रसिद्ध, मात्र येत्या काळात जिल्ह्याचे चित्र बदलणार असून महाराष्ट्राच्या विकासाचे इंजिन हा जिल्हा होणार आहे. लाडकी बहीण, शेतकरी कृषी सन्मान निधी, लखपती दीदी आदींसह विविध कल्याणकारी योजना सरकार मार्फत राबवण्यात आल्या आहेत. मात्र लाल बावटा वाले पुन्हा या ठिकाणी निवडून आले, तर या योजना बंद होतील, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

dahanu vidhan sabha mahayuti vinod medhaDevendra Fadnavisdevendra fadnavis on vadhavan bandardevendra fadnavis speeh in palgharPalghar Vidhan Sabhaडहाणू उमेदवार विनोद मेढादेवेंद्र फडणवीस पालघर भाषणवाढवण बंदर देवेंद्र फडणवीसविधानसभा निवडणूक पालघर डहाणू
Comments (0)
Add Comment