Sushma Andhare : लाडक्या बहिणीच्या भावनांची बॅनरबाजी करुन टिंगल! म्हणाल्या सुषमा अंधारे

Sushma Andhare : वांद्रे पूर्व येथे शिवसेना उ.बा.ठा.चे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या प्रचारसभेत सुषमा अंधारे यांनी लाडकी बहिण योजनेवरून शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला.

Sushma Andhare : लाडक्या बहिणीच्या भावनांची बॅनरबाजी करुन टिंगल! म्हणाल्या सुषमा अंधारे

मुंबई: अवघ्या काही दिवसांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली असतानाच प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराच्या विजयाकरीता, प्रचारसभांवरचा जोर वाढवल्याचे दिसून येत आहे.अशातच उ.बा.ठा. शिवसेना गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई ,यांच्यासाठी सुषमा अंधारे(शिवसेना उपनेत्या,ठाकरे गट) यांनी वांद्रे पूर्व येथे सभा घेतली.या सभेला रश्मी ठाकरे देखील उपस्ठित होत्या.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

आपल्या खोचक शब्दांत सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. लाडकी बहिण योजनेवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. कोणता भाऊ आपल्या बहिणीसाठी केलेल्या कामांची जाहिरात करतो? दोन पोती गहू दिले,लोणचं-पापड दिले, असं भाऊ बॅनर लावतो का? असा प्रश्न उपस्थितांना विचारला.
शिंदे-फडणवीसांचा विचार कसा वाईट आहे, ते लाडक्या बहिणीच्या भावनेची कशी टिंगल करतात, हे अंधारेंनी आपल्या विनोदबुध्दीने उपस्थितांसमोर मांडताच एकच हश्या पिकला. रश्मी ठाकरे यांनीही मोकळेपणाने हसून दाद दिली.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

bandra eastcampaignMaharashtra politicsshivsena ubtvidhansabha nivadnukबॅनरबाजीरश्मी ठाकरेलाडकी बहिण योजनावरुण सरदेसाईसुषमा अंधारे
Comments (0)
Add Comment