स्वत:च्या विकासासाठी राज्याची तिजोरी रिकामी केली, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे राज्याची जनताच ठरवेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली. कोण जिंकणार, कोण हरणार यापेक्षा महाराष्ट्र हरता कामा नये, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स

संजय व्हनमाने, मुंबई: ‘शरद पवारांनी त्यांच्या पक्षातील दोन नेत्यांची नावे मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावीत, काँग्रेसनेही तसे करावे. शिवसेनेकडून मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, हे राज्याची जनताच ठरवेल,’ अशी भूमिका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना मांडली.

महाराष्ट्र हरता कामा नये, ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट

‘ज्याचे आमदार जास्त, त्याचा मुख्यमंत्री’ असे सूत्र शरद पवार यांनी जागावाटपावेळी जाहीर केले होते. उद्धव ठाकरे यांनी या मुद्याबरोबरच शिवसेनेतील फूट, न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण, निवडणूक प्रचारास मिळणारा प्रतिसाद आदी मुद्दयांवर भाष्य केले. ‘निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आता देशातील लोकशाही आणि कायदा यांबाबत प्रवचन देत फिरावे, त्यातून त्यांचा नावलौकिक वाढेल,’ असा टोला ठाकरे यांनी लगावला. या निवडणुकीत ठाकरे कुटुंबातील कोण जिंकणार, कोण हरणार, यापेक्षा महाराष्ट्र हरता कामा नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

शिंदेंनी स्वतःच्या व मित्रांच्या विकासासाठी राज्याची तिजोरी रिकामी केली – उद्धव ठाकरे

‘एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या व मित्रांच्या विकासासाठी राज्याची तिजोरी रिकामी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीही मोडण्यात आल्या आहेत. त्यात ४० हजार कोटी रुपये नियमानुसार ठेवावेच लागतात. मात्र, त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांच्या मित्रांना पावणेतीन लाख कोटी रुपयांची कंत्राटे वाटून टाकली आहेत,’ असा आरोप ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray: स्वत:च्या विकासासाठी राज्याची तिजोरी रिकामी केली, शिंदेंवर टीका; मुख्यमंत्रिपदाबाबतही ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट

आमचेच सरकार येणार, ठाकरेंकडून विश्वास व्यक्त

महाविकास आघाडीच्या प्रचाराला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करीत ठाकरे यांनी आमचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. ‘तुम्ही तुमच्या मित्रालाच संपवायचा प्रयत्न केलात तर संकटकाळात तुमच्यासाठी मदतीला उभे राहण्यासाठीही कोणी उरत नाही, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी लक्षात ठेवावे,’ असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ‘मला माझ्या तब्येतीची काळजी नाही. महाराष्ट्रासाठी आपण लढत आहोत, शेवटी आयुष्य तरी कुणासाठी आहे?’ असा भावनिक प्रश्नही त्यांनी ‘मटा’शी बोलताना केला.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Maharashtra vidhan sabha nivadnukshivsena cm faceuddhav thackeray slams eknath shindeउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमहायुतीमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणारमहाविकास आघाडीराजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment