पोलिसांना टीप, रो-हाऊसमध्ये करोडोंची रोकड, छापा टाकताच पोलिस चक्रावले; नवी मुंबईत खळबळ

Navi Mumbai Crime News: राज्यात निवडणुकीचा हंगाम सुरू असून सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाने कुठेही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • एका रो-हाऊसमधून दोन कोटी साठ लाख रुपयांची रोकड जप्त
  • निवडणूक आयोग आणि ठाणे पोलिसांची संयुक्त कारवाई
  • नेरुळमधील धक्कादायक प्रकार
Lipi
नेरुळ रो हाऊस करोडो रुपये जप्त

अमुलकुमार जैन, नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राज्यात प्रचार कार्याला वेग आला आहे. त्या अनुषंगाने निवडणूकीच्या काळात राज्यातील पोलिसयंत्रणा अर्लट झाली असून प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. राज्यात विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपात रोकड ऐन आचारसंहिता काळात कारवाई करून पोलिसांकडून जप्त केल्या जात असल्याचं चित्र आहे.राज्यात निवडणुकीचा हंगाम सुरू असून सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाने कुठेही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित वाहनांची कठोरपणे तपासणी करण्यात येत असून अनेक ठिकाणांहून रोकड, मौल्यवान धातू, वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अशातच ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्याला नेरुळ सेक्टर १६ येथील एका रो-हाऊसमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरात रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील रो-हाऊसवर छापा टाकण्यात आला असता एकूण २ कोटी ६० लाखांची रोकड सापडली. सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून सदर कारवाई ही निवडणूक आयोगाने आणि ठाणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई केली असून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
Jogeshwari Rada: वायकरांच्या लेकीचा पाठलाग, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर धावून गेले, ठाकरे समर्थकांवर विनयभंगाचा गुन्हा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ‘आदर्श आचारसंहिता’ लागू आहे. निवडणुकीच्या काळात मतं मिळविण्यासाठी मतदारांना रोख रक्कम दिली जात असल्याचा विरोधकांकडून आरोप होत असतो. या बाबींना आळा घालण्यासाठी आयकर विभाग, मुंबई पोलीस आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे गस्त घालत असतात. तसेच छापेमारी करत असतात. त्यातच आता नवी मुंबईमधील नेरुळ सेक्टर १६ येथील रो-हाऊसमधून पोलिसांनी अडीच कोटी रुपये जप्त केले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी सांगितले की, ”आम्ही एका रो- हाऊसमधून रोख जप्त केली आहे. साधारण अडीच कोटी रुपयांची ही रोकड आहे. ही जप्त केलेली रोकड कोणाची आहे आणि नवी मुंबईत कुठून आली? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही रक्कम जप्त केली आहे”.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

crime newsnavi mumbai crime newsnavi mumbai latest marathi newsnerul row house crores of rupees seizedक्राइम बातम्यानवी मुंबई क्राइम बातम्यानवी मुंबई लेटेस्ट मराठी बातम्यानेरुळ रो हाऊस करोडो रुपये जप्त
Comments (0)
Add Comment