साताऱ्यात पिपाणी ठरली वरदान!आमचे १३ वे वंशज वाचले, त्यामुळे थोडीफार इज्जत वाचली, अजित पवार मोकळेपणे बोलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Nov 2024, 12:15 pm

लोकांना तुतारीसारखी पिपाणी दिसली म्हणून साताऱ्याची जागा वाचली, आमचा राजा वाचला असे अजित पवार ,उमेदवार सचिन पाटील यांच्याकरीता फलटणमध्ये आयोजित सभेत म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातारा : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट ) उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराकरीता फलटण येथे सभा आयोजित करण्यात आली. या सभेला स्वतः अजित पवार उपस्थित होते.लोकसभेला झालेल्या पराभवाविषयी ते बोलत होते. “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अर्ध्या टक्क्याहून थोडंसं जास्त मतदान झालं खरं पण त्याचा परिणाम वेगवेगळ्या जागांवर झाला. खरंतर संविधान बदलाचा जो भ्रम महायुतीच्या बाबतीत पसरवला गेला त्यामुळे मागासवर्गीय आणि आदिवासी,मुस्लिम जनतेचा अपेक्षित पाठींबा मिळाला नाही ज्यामुळे एनडीएला हवं तेवढं बळ राज्यात मिळालं नाही.”

तुतारीसारखी पिपाणी दिसली,साताऱ्याची जागा वाचली!

साताऱ्याच्या जागेबाबत बोलताना त्यांनी पिपाणीमुळे वाचलो असं विधान केलं. लोकांना तुतारीसारखी पिपाणी दिसली म्हणून साताऱ्याची जागा वाचली, आमचा राजा वाचला, असं ते म्हणाले. आमचे १३ वे वंशज वाचले, त्यामुळे थोडीफार इज्जत वाचली, असंही अजित पवार म्हणाले.

Source link

faltanMaharashtra politicsnewssataravidhansabha electionअजित पवारउदयनराजे भोसलेतुतारीसंविधानसचिन पाटील
Comments (0)
Add Comment