Swami Samarth Annapurna Story: स्वामी समर्थांची अन्नपूर्णा स्वरुपात पूजा ! वाचा कथा

Swami Samarth Katha Kahani: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..! हे शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात श्री स्वामी समर्थ ! या एका मंत्राने स्वामी समर्थ यांनी भक्तांना अभयदान दिले आहे. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे जगभरात स्वामींचे लाखो भक्त आहेत. स्वामी समर्थ यांनी अनेक रूपं घेवून भक्तांचा उद्धार केलेला आहे. स्वामी समर्थांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत त्यातील एक कथा म्हणजे भक्तांसाठी स्वामी समर्थांची धारण केलेले अन्नपूर्णा स्वरुप ! चला तर याबदद्ल अधिक जाणून घेवूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Swami Samarth Annapurna Swarup Katha:

अशक्यही शक्य करतील स्वामी असे म्हणत भक्त स्वामी समर्थांसमोर नतमस्तक होतात.स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगाध असून ते भक्तांना नेहमी मदत करतात, त्यांना एकटं सोडत नाहीत. असेच एकदा त्यांनी भक्तांसाठी अन्नपूर्णा रुप धारण केले. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरुपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. याबद्दल अधिक जाणून घेवूया.

अन्नपूर्णा पार्वतीचा अवतार

अन्नपूर्णा देवीची पूजा घराघरात केली जाते. अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीचा अवतार आहे. हिंदु संस्कृतीनुसार घरात सगळ्यांना पोटभर जेवू घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा म्हटले जाते. ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा, आदर, मानसन्मान होतो तिथे धनधान्याची कमी होत नाही अशी मान्यता आहे. स्वामी समर्थ यांनी अन्नपूर्णेचे रूप घेवून भक्तांना जेवू घातले होते. स्वामींच्या अन्नपूर्णा रूपाची अनेक ठिकाणी पूजा घातली जाते.

अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी समर्थ

एकदा काय झालं, कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींसोबत श्रीपाद भट आणि १०० सेवेकरी होते. खूप प्रवासानंतर सगळेजण दमले होते. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तिथे शेतकऱ्यांने स्वामींसह सगळ्यांना फलहार आणि पाणी दिले. पण भोजनाचे काय? तेव्हा स्वामी सगळ्यांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा. सगळ्यांना वाटले.
कोणीतरी जेवण देईल, श्रीपादभटांना मात्र स्वामीवर पूर्ण विश्वास होता, ते सगळं काही ठिक करतील याची खात्री होती. श्रीपाद भट सगळ्यांना घेवून आम्रवृक्षाखाली गेले. तिथे एक सुवासिनी ज्येष्ठ महिला प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपादभटांनी चौकशी केली, तेव्हा महिला म्हणाली, ‘आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती. पण अजून ती आली नाहीत. सूर्यास्त होतो आहे, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा’ तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपादभटाना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट आणि अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. सगळ्यांनी त्या सुवासींनी महिलेस सोबत येण्याचा आग्रह केला पण ती म्हणाली’ तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते.’ श्रीपाद भटांसह सर्व सेवेकरी भोजन करून तृप्त झाले. अशाप्रकारे स्वामी समार्थानीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले. एवढेच नाही तर साक्षात देवी अन्नपूर्णेचे दर्शन देखील झाले. म्हणून अनेक ठिकाणी स्वामी समर्थ यांच्या अन्नपूर्णा रूपाची पूजा केली जाते.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

गुरुवार विशेषस्वामी समर्थ अन्नपूर्णा स्वरुपस्वामींचे रुप
Comments (0)
Add Comment